राजकिय

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी केली तयारी! पुसद नगर परिषदेवर वर्षांनुवर्षे राक्षसी महत्वकांक्षा असलेली सत्ता उलथुन टाकु ; काँग्रेसचे नेते ॲड.दिलीपभाऊ एडतकर यांचे पत्रकार परिषदेत माहिती..

पुसद : नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक२०२५ ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढवण्याचा निर्णय आघाडीतील स्थानिक नेत्यांनी आज (दि.८) नोव्हेंबर दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास हॉटेल दरबार येथे संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केला. या वेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), या तिन्ही पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.यावेळी महविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या निवडणुका एकत्रीतपणे लढणार-शरद मैंद महाविकास आघाडीने यापूर्वी सुद्धा लोकसभा व त्यानंतर विधानसभा एकत्रपणे लढविली होती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत आघाडीतील घटक पक्षातील कार्यकत्यांना संधी मिळावी म्हणुन अनेकांचा वेगवेगळे लढावे असे वाटत होते. त्यामुळे प्रत्येकालाच वाव मिळेल. सर्वांचीच भूमिका पक्ष श्रेष्ठींकडे ठेवण्यात आली. परंतु वेगवेगळे लढले तर मताचे विभाजन होईल यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र येवून एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय झाला. त्याचबरोबर समविचारी पक्षांना सोबत घेवून महाविकास आघाडी लढणार आहे असे पत्रकार परिषदेत राकाँ शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस शरद मैंद यांनी सांगितले.

या निवडणुकीत विकासाचा मुद्दा राहणार असुन वार्डावार्डात महाविकास आघाडीतर्फे सक्षम उमेदवार देण्यात येईल. त्याप्रमाणे आरपीआय गवई गटाने सुध्दा महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये जागा वाटप जाहीर करण्यात येईल. नगराध्यक्ष पद हे महाविकास आघाडीत काँग्रेसला सोडण्यात आले आहे. ते जो कोणी उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी सक्षमपणे त्यांच्या पाठिशी उभी राहिल असे शरद मैंद म्हणाले. याप्रसंगी त्यांनी पुसद न. प. निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे निवडणूक प्रमुख म्हणुन राकाँचे शहराध्यक्ष डॉ. अकिल मेमन यांचे नाव जाहीर केले.यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पुसद विधानसभा मतदार संघाचे पक्ष निरीक्षक म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून पुसद नगर परिषदेवर राक्षसी महत्वकांक्षा असलेल्या लोकांची सत्ता आहे.ही सत्ता पालट करण्याची ताकद महाविकास आघाडीमध्ये असुन पुसद नगर पालिकेत महाविकास आघाडीची सत्ता येणार असा विश्वास या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राकाँ शरद पवार व शिवसेना उबाठा हे तीन पक्ष एकत्र येवून येवून पुसद नगर परिषदेची निवडणूक लढणार आहेत. यामध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा काँग्रेसचा राहील. पक्षाकडे डॉ. मोहम्मद नदीम व अनिल शिंदे हे दोन नावे पक्षश्रेष्ठीकडे पाठविण्यात आली आहेत. येत्या १२ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या काँग्रेस कमिटीच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत अध्यक्षीय उमेदवार ठरणार असल्याचे यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी एकत्र बसुन सर्व १५ प्रभागात ३१ उमेदवार देणार असुन सर्व पक्षांना यामध्ये संधी मिळणार असल्याचे सांगितले.यामध्ये पत्रकारांचेही सहकार्य अपेक्षित आहे. महाविकास आघाडीचा आवाज ते बुलंद करतील असे शेवटी ॲड. दिलीप एडतकर म्हणाले.या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असून महायुतीत मात्र अजूनही धूस फूस पाहायला मिळत असून महायुती पुसद नगरपरिषदेच्या निवडणुका स्वतंत्र लढणार असे चित्र सध्यातरी स्पष्ट दिसत आहे.

या पत्रकार परिषद मध्ये प्रास्ताविक राकाँ शरद पवार गटाचे शहराध्यक्ष डॉ. अकिल मेमन यांनी केले.पत्रकार परिषदचे आभार शिवसेना जिल्हा उपप्रमुख ॲड. विरेंद्र राजे यांनी मानले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे पुसद विधानसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक ॲड.दिलीप येडतकर माजी आमदार डॉ. वजाहत मिर्झा, काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. मोहम्मद नदीम, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शरदभाऊ मैंद, शहराध्यक्ष डॉ. अकिल मेमन, नाना बेले, पुसद जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष विजयराव चव्हाण, अनिल शिंदे, शिवसेनेचे रवि पांडे, राकाँचे अनुकूल चव्हाण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख ॲड. वीरेंद्र राजे,शहर प्रमुख वैभव सुने, सैय्यद इस्तियाक, परमेश्वर जयस्वाल, सोमेश्वर जयस्वाल, काँग्रेस शहराध्यक्ष शेख जिया, ज्ञानदीप कांबळे आदी महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close