दिवंगत लोकनेते देवराव पाटील चोंढीकर स्मृती व्याख्यान; श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद व विदर्भ साहित्य संघ शाखा पुसद च्या वतीने आयोजन!

पुसद-श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद व विदर्भ साहित्य संघ शाखा पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष माजी आमदार तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे संस्थापक अध्यक्ष दिवंगत लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांच्या३९ व्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानपुष्पाचे आयोजन रविवार दि,३० नोव्हेंबर२०२५ ला सायंकाळी ६.०० वाजता श्री शिवाजी विद्यालयाच्या देवराव पाटील चोंढीकर सभागृहात करण्यात आले आहे .*भाषा आणि आपण* या विषयावर मराठी विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर येथील *प्रा. डॉ. दासू वैद्य हे व्याख्यान पुष्प गुंफणार आहेत. अविरत चालणाऱ्या व्याख्यान पुष्पाचे हे ३८ वे वर्ष आहे. याप्रसंगी विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ.मुस्तजीब खान व निवेदक तथा सूत्रसंचालक डॉ प्रेषित रुद्रवार उपस्थित राहणार आहेत.पुसद शहर व परिसरातील रसिक नागरिकांनी या आत्यंतिक जिव्हाळ्याच्या विषयावरील अभ्यासपूर्ण व सुश्राव्य अशा व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. एन.पी. हिराणी, कार्याध्यक्ष माजी आमदार विजयराव पाटील चोंढीकर, सचिव डॉ. उत्तम रुद्रवार ,कोषाध्यक्ष कृषी भूषण दीपक आसेगावकर व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध विजयराव पाटील चोंढीकर यांनी केले आहे.



