ईतर

मणिपूर राज्यात आदिवासी महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचाराचा निषेधार्थ ९ ऑगस्ट रोजी भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन; लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आदिवासी कृती समितीचे आवाहन!

पूसद: मणिपूर राज्यात दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर अमानवीय अत्याचार कारण्यात आला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. सर्व स्तरावरून या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला जात आहे.त्या महिलांची नग्न धिंड काढणाऱ्या आरोपींना फाशी द्या अशी मागणी जोर धरू लागली तर या घटनेवरून संपूर्ण देशात महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तर दुसरीकडे डबल इंजिन सरकारने नैतिकता हरविल्यामुळे राज्य व केंद्र शासनाचा निषेधार्थ आदिवासी जागतिक दिनानिमित्त आदिवासी कृती समितीच्या वतीने पुसद शहरात भव्य निषेध आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. या निषेध मोर्चाला लोकशाही मानणाऱ्या सर्व समाजाच्या वतीने लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान दि.६ ऑगस्ट२०२३ रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास हॉटेल रामकृष्ण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आदिवासी कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ४ मे रोजी घडल्याने या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. याची दखल सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून घेतली आहे.दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर अमानवीय अत्याचार कारण्यात आला.तर एकीकडे मध्यप्रदेशातील भाजपा आमदाराचा कार्यकर्ता प्रवेश शुक्ला याने आदिवासी युवकाच्या अंगावर लघुशंका केली या अमानवीय कृत्य करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या इसमावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच समान नागरी कायदा आदिवासींचा पारंपारिक रूढी परंपरा व संविधानिक हक्क अधिकाऱ्यांना मारक असल्यामुळे आदिवासींना हा कायदा लागू करण्यात येऊ नये. या मागणीसहवादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि अजब तर्कटांसाठी प्रसिद्ध असलेले शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान संस्‍थेचे संस्‍थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांना महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने अटक करा व त्याच्यावर कायमस्वरूपी लगाम लावावा अशा मागणीचे निवेदन महिलांच्या माध्यमातून देशांच्या महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत देण्यात येणार असल्याची माहिती मोर्चाचे आयोजक कृती समितीच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. या भव्य मोर्चामध्ये लोकशाहीला अभिप्रेत सर्व सामाजिक संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन मोर्चाचे आयोजक यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.

मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून हिंसाचाराच्या ज्वाळा धगधगत आहेत. याच काळात अस्वस्थ करणारे अनेक फोटो, व्हीडिओ व्हायरल होत आहेत.मणीपुर गेल्या दोन महिन्यांपासून जळत आहे. येथील दंगली आजही थांबलेल्या नाहीत. अनेक नागरिक मणीपुरमधून पलायन करत आहेत. तर स्त्रियांची अब्रू देखील वेशीववर टांगली जात आहे. या सर्व प्रकारावर सुप्रीम कोर्टाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पोलिस आणि यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, मणिपूरमध्ये कायदा-सुव्यवस्था आणि घटनात्मक यंत्रणा ढासळली आहे. पोलिस या प्रकरणी सुस्त असून त्यांच्या तपासात शैथिल्य आणि बेपर्वाई सुरू आहे. माजी सैनिकाच्या पत्नीसह इतर महिलांना पूर्णता विवस्त्र करून धिंड काढल्या गेली. एक नव्हे शेकडोंच्या संख्येतील नराधमांनी छेडखानी, बलात्कार, खून, असे प्रकार करून समाजात दहशत माजवली आहे. आणि भाजपचे डबल इंजिन सरकार असताना मनिपुरराज्य सरकार व केंद्र सरकार अश्या नराधमांची पाठराखन करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पिडीत महिला आदिवासी समाजाच्या आहे, परंतु देशामध्ये मुली महिलांना आदराने सन्मानाने वागण्याची संस्कृती प्रथा परंपरा आहे. त्यामुळे आदिवासीच नव्हे तर देशातील कोणत्याही जातीतील महिलांवर अश्या प्रकारचे अन्याय होता कामा नयेत, अशीच समानतेची, आदराची आणि सन्मानाची शिकवण भारतीय राज्यघटनेने दिली आहे. असे असताना सार्वजनिक ठिकाणी महिलांची नग्न धिंड काढल्या जाते आणि सोशल मीडियावर मणिपूरमधील या हादरवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशातील १४०कोटी जनतेची मान शरमेने खाली झुकली आहे. सर्वकाही पोलिसांसमोरच घडले आहे, परंतू गुन्हा ४९ दिवसांनी तर पहिली अटक ७८ दिवसांनी झाली आहे. अशी घटना घडल्यानंतर मणिपूर च्या राज्य व केंद्र शासनातील भाजप सरकार कोणतेही ठोस पावले उचलत नाही. महिलेच्या नग्न धिंड च्या घटनेनंतर संपूर्ण देशात दहशत माजली आहे. अशा आरोपींना वेळीच फाशीची शिक्षा झाली नाही तर असे गावगुंड यांना बळ मिळेल आणि अशा घटनेची पुनरावृत्ती होईल त्यामुळे अशा मानसिकता असणाऱ्यांना जागीच ठेचण्याची गरज आहे. तेव्हा यातील दोषींवर फाशीच्या शिक्षे सोबतच महिला मुलींसोबतच देशवासीयांमध्ये पसरलेली दहशत कमी करण्यासाठी योग्य ती पावले उचलावी अशी मागणी करत मणिपूर केंद्र व राज्य सरकारच्या निषेध नोंदविण्यासाठी पुसद येथे भव्य आक्रोश मोर्चा ९ ऑगस्ट २०२३ रोजी जागतिक आदिवासी दिनी आयोजित केली असल्याची माहिती आदिवासी कृती समिती पुसदचे अध्यक्ष माधवराव वैद्य यांनी येथील रामकृष्ण हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  तसेच सर्व सामाजिक संघटनांनी व महिलांचा आदर सन्मान करणाऱ्या भारतीय नागरिकांनी या निषेध मोर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन सुद्धा मोर्च्याच्या आयोजकांनी केले आहे. त्याबरोबरच नेहमीच वादग्रस्त असलेल्या व आपल्या वादग्रस्त विधानातून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणे, अप शब्दाचा वापर करून सामाजिक भावना दुखावणे, देश विरोधी वक्तव्यातून वाद निर्माण करणारे तुकाराम भिडे यांना लगाम न लावल्यामुळे त्यांनी आज महामानवांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली आहे त्यामुळे महामानवानबद्दल अपशब्द बोलणाऱ्या या मनोहर उर्फ संभाजी भिडे चा निषेध सुद्धा या मोर्चातून नोंदविल्या जाणार असल्याची माहिती कृती समितीने दिली आहे. सदर भव्य आक्रोश मोर्चा पुसद येथील बिरसा मुंडा चौक येथून सुरुवात होणार असून बस स्टॅन्ड चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नेताजी सुभाषचंद्र बोस चौक मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा गांधी चौक या मार्गाने मार्गस्थ होत तहसील कार्यालय परिसरातील यशवंत रंग मंदिरावर या मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे. या भव्य आक्रोश मोर्चामध्ये तमाम आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहे. त्यासोबतच महिलांचा आदर सन्मान राखणारे नागरिक तथा सामाजिक संघटनांचाही सहभाग होणार आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली. यावेळी आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष माधवराव वैद्य, कार्याध्यक्ष ॲड.सुनील ढाले, उपाध्यक्ष सुरेश धनवे, सचिव नारायण कराळे, सदस्य ज्ञानेश्वर तडसे, रंगराव काळे, ॲड .रामदास भडंगे, फकीरा जुमनाके, पांडुरंग व्यवहारे, गजानन उघडे, गणपत गव्हाळे म, हरिदास बोके, राजू तडसे, गजानन टारफे, सुदाम चिरंगे, संतोष गारूळे, नामदेव इंगळे, गजानन टाले, समाधान बळी, ॲड. संदीप कोठुळे, लक्ष्मण पांडे, शिवाजी तोरकड प्रसिद्धी प्रमुख मारोती भस्मे, यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी मोर्चाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close