ईतर

कवडीपूर जिल्हा परिषद शाळेला ‘माॅडेल स्कुल’ची निर्मिती होणार; कवडीपूर ग्रामपंचायतीचे सरपंच मयूर राठोड यांच्या प्रयत्नांना यश!

१ कोटी १९ लक्ष रुपयातून ज्ञानार्जनासाठी पाच वर्ग खोल्यासह सुसज्ज इमारत!

पुसद : तालुक्यातील कवडीपुरचे सरपंच नाईक कुटुंबाचे समर्थक मयूर राठोड यांच्या पाठपुराव्याने भोजला केंद्रातील कवडीपूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेसाठी मंजूर झालेल्या माॅडल स्कुलच्या जागा निश्चितीचे काम सरपंच, सदस्य,सचिव व गावकर्‍यांनी केल्यामुळे लवकरच बांधकाम सुरु होऊन अवघ्या सहा महिण्यात माॅडेल स्कुल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जणासाठी उपलब्ध होणार आहे.

  पुसद तालुक्यात कवडीपूर येथील वर्ग १ ते ८ च्या २५० विद्यार्थ्यांसाठी शाळा खोल्यांची कमतरता असल्याची बाब कवडीपूरचे सरपंच मयुर राठोड व गावकर्‍यांनी आमदार इंद्रनिल नाईक,माजी आमदार अॅड.निलय नाईक यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी कवडीपूर शाळेसाठी खनिकर्म विकास निधीतून माॅडेल स्कुल बांधकाम करण्याची तांत्रिक मंजूरात आॅगष्ट २०२४ मध्ये मिळवून दिली होती.त्यामध्ये कवडीपूर येथे दुमजली पाच वर्गखोल्या,दोन वाॅशरुम,एक मुख्याध्यापक खोली, एक ग्रंथालय,जिना, गेटसह डायस व संपूर्ण व्हरांडा ग्रीलने बंदिस्त अशी एक कोटी एकोणवीस लक्ष नव्व्यान्नव हजार चारशे पाच रुपयांच्या प्राकलनाची सुसज्ज इमारत होणार होती परंतु दरम्यान विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे तसेच जागा निश्चिती अभावी येथील कामाला सुरवात झाली नव्हती. नव्याने बांधण्यात येणार्‍या माॅडेल स्कुलच्या जागा निश्चितीसाठी गावचे सरपंच मयुर राठोड,ग्राम पंचायत सदस्य प्रकाश चव्हाण,संतोष पवार, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत पंडितकर, कंत्राटदार वैभव बजाज,कनिष्ठ अभियंता तथा समग्र शिक्षा अभियान यवतमाळचे कार्यकारी अभियंता गजानन माहुरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभय पवार, श्री.मनवर,शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र तालंगकर,किसन राठोड,प्रवीण राठोड यांनी पुढाकार घेऊन मंगळवारी नव्याने बांधण्यात येणार्‍या सुसज्ज इमारतीची जागा निश्चित करुन दिली.यावेळी शिक्षक शशिकांत जामगडे,माधव कानगुले,श्रीकांत चव्हाण व गावकरी उपस्थित होते.लवकरच माॅडेल स्कुलचे ले—आऊट टाकून बांधकामाला सुरवात करुन अवघ्या सहा महिण्यात दर्जेदार व सुसज्ज अशा इमारतीचे बांधकाम करुन देऊन ज्ञानार्जणासाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे कंत्राटदार श्री.बजाज यांनी उपस्थितांना सांगितले.कवडीपुरचे सरपंच मयूर राठोड यांच्या पाठपुराव्याने वेळोवेळी स्थानिक आमदार इंद्रनील नाईक तसेच माजी आमदार विधान परिषद सदस्य ॲड .निलय नाईक शाळेच्या सुसज्ज इमारतीच्या बांधकामासाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने हे काम मार्गी लागले असून  गावकर्‍यांनी आमदार इंद्रनिल नाईक,माजी आमदार अॅड.निलय नाईक,मोहिनी नाईक,अमेय नाईक यांचे आभार व्यक्त केले आहे तर तालुक्यात गावाला जिल्हा परिषदेच्या शाळेला अशी सुसज्ज इमारत मिळत असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close