राज्यस्तरीय स्पर्धेत कु.संजना जयस्वाल हिने दोन स्वर्ण पदक पटकाविले!

पुसद/विशेष प्रतिनिधी : उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या ६ व्या राज्यस्तरीय स्किल डो मार्शल आर्ट स्पर्धेत काळी दौ. येथील कु.संजना सुभाष जयस्वाल हिने दोन सुवर्णपदके पटकावून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला.
दि.९ व १० सप्टेंबर या दोन दिवशी झालेल्या स्किल डो मार्शल आर्ट स्पर्धेत राज्यातील २२ जिल्ह्यामधून वेगवेगळ्या वयोगटातील मुला मुलींनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १५ स्पर्धकांनी सहभाग घेतले होते. कुमारी संजना सुभाष जयस्वाल हिने कताज व कुमिते (फाईट) या प्रकारात आपल्या वयोगटातील स्पर्धकांमध्ये ३ सुवर्णपदक पटकावले. कुमारी संजना जयस्वाल हिने पटकावलेल्या दोन स्वर्ण पदका चे बळावर यवतमाळ जिल्हा हा राज्यातून प्रथम जिल्हा येण्याचा बहुमान मिळविला.
कुमारी संजना सुभाष जयस्वाल हिने दोन स्वर्ण पदके पटकावल्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.तीचे वर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. आपल्या यशाचे श्रेय सुवर्णपदक विजेती कुमारी संजना जयस्वाल ही आपले आई-वडील तसेच मार्गदर्शक कोच पुनम वर्मा यांना देते. भविष्यातही राष्ट्रीय स्तरावर योग्य ती कामगिरी करून गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे नाव लौकिक करण्याचा मनोदय तिने व्यक्त केला.



