क्रांतिसुर्य धरतीआबा बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती आदिवासी कर्मचारी मंच, जमाना यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी!

अक्कलकुवा/प्रतिनिधी:भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलनामध्ये सहभागी असलेले इतिहासातील एक महत्वपूर्ण व्यक्ती म्हणून ओळखले जाणारेआदिवासी समाजाचे आराध्य दैवत क्रांतीसूर्य, धरती आबा, विर, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने १५ नोव्हेंबर रोजी विर बिरसा मुंडा यांची १५० वी जयंतीओरपा (सोराबारा), येथील आदिवासी कर्मचारी मंच, जमाना यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होती.
सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेच पुजन व अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास अविनाश वसावे (सरपंच- उमरागव्हाण ग्रा.पं.),नर्मदाबाई अशोक वसावे (उपसरपंच- उमरागव्हाण ग्रा. पं.) बुलाखी वसावे (माजी पोलीस पाटील), हिरालाल वळवी (से.नि. मुख्याध्यापक- आश्रमशाळा),मुंगल्या वळवी (मुख्याध्यापक- जि.प. उमरागव्हाण), जयसिंग वळवी, मोगा वळवी, अॅड. महेश वसावे, पिसा वळवी (अध्यक्ष- बिरसा मुंडा अॅथलेटीक्स क्लब) सुरूपसिंग वसावे, रविंद्र वसावे, इंद्रसिंग वळवी, लोकेश वळवी, ईश्वर वळवी, बिरसा मुंडा अॅथलॅटीक्स क्लबचे विद्यार्थी-विद्यार्थीनीं- अमित वसावे, अतुल वसावे, रोहित वळवी, राहुल वळवी, दिपक वळवी, बादल वसावे, रविता वसावे, पल्लवी वळवी, अपुर्वा वसावे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जमाना ऐरियातील अधिकारी-कर्मचारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



