खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आडगाव शेत शिवारातून सव्वा लाखाच्या गांजाची झाडे जप्त!

पुसद:खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आडगाव शेत शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील सव्वा लाखाच्या वर किंमत असलेले गांजाची झाडे जप्त करण्यात आले असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आडगाव शेत शिवारातील खंडाळा येथील शेतकरी भगवान तुकाराम गादेकर या शेतकऱ्यांच्या शेतात गुप्त माहितीच्या आधारे खंडाळा पोलिसांनी पाहणी केली असता त्यांचे शेतात ३ ते ५ फुट कमी अधिक उंचीची गांजाची झाडे आढळून आली. खंडाळा पोलिसांनी पंचासमक्ष ती गांजाची सर्व झाडे एका ठिकाणी: ठिकाणी जमा करून त्या गांजाच्या झाडांचे वजन केले असता १० किलो ८७४ ग्रॅम भरले. या अमली पदार्थ हिरवट रंगाच्या गांजाच्या झाडांची किंमत २७ हजार १८५ रुपये आढळून आली.या कार्यवाही दरम्यान येथुन काही किमी अंतर दरम्यान याच पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या आडगाव येथील नत्थु कोंडबाराव चिरमाडे (५५) या शेतकऱ्यांचे शेतात गांवाच्या झाडांची लागवड करण्यात आली असल्याची गुप्त माहितीच्या आधारे प्राप्त होताच खंडाळा पोलिसांनी ताफ्यासह आडगाव येथे जाऊन चिरमाडे या शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी केली.३ ते ५ उंचीची हिरवट रंगाची ३९ किलो ६२५ ग्रॅम वजनाची २५०० रुपये प्रति किलो प्रमाणे ९९ हजार २६० रुपयाचा मुद्देमाल आढळून आला. दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतातील ५० किलो ४९९ ग्रॅम किलो वजनाचा १ लाख २६ हजार ४४५ रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष फोटोग्राफर समक्ष जप्त करण्यात आला. या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार असून वृत्त लिहीस्तोर त्यांना अटक करण्यात आली नव्हती. हि कार्यवाही खंडाळा ठाणेदार देविदास पाटील, पोलीस उपनिरीक्षक देवानंद कायंदे, पुसद खंडाळा कर्मचाऱ्यांना केली.



