खंडाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल:शेंबाळप्रप्री येथे तलवार बाळगणाऱ्या तरुणाला केली अटक: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई!

पुसद : तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेंबाळप्रप्री येथे एका २० वर्षीय तरुणाला तलवार बाळगून दहशत निर्माण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकाच्या पाेलिसांनी अटक केली. त्याच्या विरुद्ध आर्म ॲक्टनुसार खंडाळा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सुत्रांनी झेप न्यूज ला दिलेली माहिती अशी की,यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्त पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. १४ऑगस्ट २०२५रोजी पुसद व उमरखेड उपविभागात गस्तीवर असतांना खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे-शेंबाळपिंपरी येथील एक तरुण नामे-सोमनाथ विनायक सुर्यवंशी यांचे ताब्यात धारदार लोखंडी तलवार असून सदरची तलवार तो त्याचे घरी ठेवलेली आहे तसेच तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करुन दुखलपात्र गुन्हा करण्याचे इरादयाने ही लोंखडी धारधार तलवार बाळगून आहे अशी मुखबीरव्दारे खात्रीशिर माहीती मिळाल्याने नमूद खालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचासह मौजे-शेंबाळपिंपरी येथे जावून कौशल्यपुर्ण विचारपूस करुन पंचा समक्ष घरझडती घेतली असता त्याचे घरातून एक धारधार पाते असलेली लोखंडी तलवार किंमत रु २०००/- रु मिळून आल्याने ती जप्त करुन ताब्यात घेवून आरोपी सोमनाथ विनायक सुर्यवंशी वय २० वर्ष, रा.शेंबाळपिंपरी ता. पुसद जि.यवतमाळ यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन खंडाळा येथे कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये खंडाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता सा, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात सा, पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि/शरद लोहकरे, पोहवा/मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा/ रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



