पूरग्रस्त नागरिकांसाठी भारती मैंद पतसंस्थेचा आधार आपुलकीचा

पुसद :तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने नदी नाल्या काठी व सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले.अनेकांच्या घरातील दैनंदिन उपयोगातील साहित्य देखील पाण्यात वाहून किंवा भिजून गेले. या नैसर्गिक आपत्ती ला पाहून सामाजिक कार्याचा वसा जपणाऱ्या भारती मैंद नागरी सह. पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत समिती अध्यक्ष तथा पुसद अर्बन बॅंकचे अध्यक्ष शरद मैंद यांनी नुकसान ग्रस्त भागची पाहणी केली.
पूरग्रस्त भागातील अत्यंत विदारक परिस्थिती पाहता तेथील नागरिकांना आपुलकीचा आधार म्हणून ८दिवस पुरेल इतके किराणा (५की. पीठ,३किलो तांदूळ, तेल, साखर, चहा पत्ती व मसाला ) साहित्य देण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार काल आदर्श नगर मधील १५०, कोपरा फाटा ३७, धनकेश्वर नगर येथील १२०, इटावा १६३ नागरिकांना वरील साहित्याचे किट वाटप करण्यात आले.असून बोरी मु. येथे ५० महावीर नगर भागात ४०, कोपरा गाव येथे ३०किट वाटप करण्यात येणार आहे. एकूण ७००किट वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले.
असल्याचे पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी सांगितले. शरद मैंद यांच्या सह बँकेचे सर्व संचालक, बँकेच्या सामाजिक उपक्रम समिती चे सदस्य , स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य,भारती मैंदपतसंस्थेचे सर्व संचालक, सर्व सामाजिक उपक्रम समिती सदस्य, सर्व अधिकारी कर्मचारी,शरद मैंद मित्र मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीत मागील दोन दिवसांपासून वरील सर्व पूर प्रभावित भागात मदत वाटप सुरु आहे.
एकीकडे शासनाकडून नुकसान ग्रस्त भागात सर्व्हे चे काम सुरु असतांना पूरग्रस्त नागरिकांना वेळेवर किराणा किट उपलब्ध करून दिल्या बद्दल मदत मिळालेल्या पूरबाधित नागरिकांनी भारती मैंद पतसंस्था तसेच सामाजिक उपक्रम समिती चे अध्यक्ष शरद मैंद, सर्व संचालक यांचे प्रती समाधान व्यक्त करीत आहे.