जि.प. प्राथमिक मराठी शाळा दादाजीनगर येथे केंद्र हिवराची शिक्षण परिषद संपन्न!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):हिवरा केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दादाज नगर येथे गुरुवार दि.३१ ऑगस्ट २०२३ ला अतिशय आनंदात व उत्साहात पार पडली शिक्षण परिषदेचे आयोजन नियोजित वेळेनुसार करण्यात आले होते या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी हिवरा केंद्राचे केंद्रप्रमुख अनुप पंडित हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जवळकर सर,उच्चश्रेणी मुख्याध्यापक बोक्षे सर, डॉ. साहेबराव कोल्हे, गोडें सर , रमेश खंदारे, राजेश राऊत ,हे होते.
यावेळी केंद्रातील मुख्याध्यापक श्याम बांडे, प्रीतीश पंडित, मारुती डुकरे, नितीन व्यवहारे, मंगेश बावने, शरद सावनकर, सय्यद सर, रुपेश दहेलिया,शेकोराव चिरंगे, हे उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व सहाय्यक शिक्षक हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी केंद्रातील गुणवत्तेविषयी आढाव चर्चा करण्यात आली.
तसेच वेगवेगळ्या शिक्षकांनी केंद्रात वेगवेगळे नवनवीन उपक्रम राबवून त्यांचा फायदा इतर शाळेंना सुद्धा व्हावा या दृष्टीने प्रयत्न करण्यासंदर्भात माहिती आढावा घेण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख अनुप पंडित सर यांनी प्रशासकीय माहिती विषयी माहिती दिली. तर साधन व्यक्ती जवळकर सर यांनी इतर विषयासंबंधी माहिती दिली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहवर्धक हिवरा केंद्राची शिक्षण परिषद संपन्न झाली.
सदरील शिक्षण परिषदेला मा. विस्ताराधिकारी गोपाल कटकमवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावंनकर सर यांनी केले. तर आभार आंबेकर सर यांनी मानले. शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांनी परिश्रम घेतले.



