ईतर

कासारबेहळ शेत शिवारातून दिवसाढवळ्या जेसीबीच्या साह्यानेअवैध गौण खनिजाचे उत्खनन! महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम) महागाव तालुक्यातील कासारबेहळ शेत शिवारात व वन विभागाच्या सीमेवरील शेतशिवारातून अवैध गौण खनिजाची तस्करी दिवसाढवळ्या नाममात्र रॉयल्टी काढून हजारो ब्रास उत्खनन होत सुरू असून ईजनी येथे काही दिवसापूर्वी वनविभाग काळी दौलत व महसूल विभाग महागावणे संयुक्त कारवाई केलेल्या त्याच जेसीबीच्या सहाय्याने अवैध उत्खनन करण्यात येत असल्याचे बोलल्या जात असून तस्करी दिवस रात्र सुरु असुन याकडे महसूल प्रशासन,जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे नवीन घरांना भरतीसाठी, अनेक ले आऊट मध्ये ट्रॅक्टरद्वारे गौण खनिजाची व रेतींची वाहतूक केली जात आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणावर दिवसरात्र अवैध गौण खनिज व रेतीची वाहतूक होत असून वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही महसूल प्रशासनाच्या आशिर्वादाने गौण खनिज व रेती तस्करी सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कासारबेहळ शेतशिवारातील परिसरातील गावात येथून अनेक गावात अवैध रित्या मुरूम टाकल्या जात आहे तसेच अवैध गौण खनिज उत्खनन सर्रास सुरू आहे.

परिसरातून ट्रॅक्टर द्वारे दिवस रात्र अवैध गौण खनिजाची वाहतूक वनविभाग व महसूल विभागाच्या आशिर्वादाने सुरू आहे. हिवरा येथील तलाठी मंडलाधिकारी कार्यालय समोरुन ही अवैध तस्करी केली जाते मात्र कुणीही कारवाई का करीत नाही ? गौण खनिज बांधकाम मालकांना अव्वाच्या सव्वा भावात विकून आपली तुंबडी भरत आहेत.वास्तविक पाहता गौण खनिजाला आळा बसावा, यासाठी भरारी पथके केली गेली कुठे हा प्रश्नच आहे.

दिवसरात्र मोठ्या जोमाने सुरू असलेली ही अवैध तस्करी महसूल विभागाच्या आशिर्वादाने सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तसेच या जेसीबीच्या साह्याने दिवसा ढवळ्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्या तस्करावर कारवाई करण्याची मागणी होत आहे अर्थपूर्ण संबंधामुळे कुंभकर्णी झोपत असलेले महसूल प्रशासन जागी होईल का ? हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे फुलसावंगी वानेरवाडी रेती साठ्यावर रात्रीतून ज्याप्रमाणे तत्कालीन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी कारवाई केली होती त्याप्रमाणेच विद्यमान जिल्हाधिकारी यांनी तस्करावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकाकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close