मोहन नागपूरकर यांना कासर समाज जीवन गौरव पुरस्कार जाहिर!

पुसद:दरवर्षी प्रमाणे देण्यात येणारा, संत तुकोडजी महाराज कासार समाज बहुउद्देशीय मंडळ, विदर्भ कासार समाज मंडळ, नागपूर तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘समाज जीवन गौरव पुरस्कार” सन २०२३. जाहीर झाला असून, सर्व सामाजिक क्षेत्रात चांगले कार्याचा आढावा घेऊन, यवतमाळ जिल्हा मधून पुसद येथील ‘मोहन ना. नागपूरकर, पुसद, यांना ‘समाज जीवन गौरव पुरस्कार’, आमदार दादारावजी केचे, (आर्वी) यांचे हस्ते देऊन दि.३ डीसेबर २०२३रोज रविवारला श्रीक्षेत्र वरखेड ता.तिवसा जी. अमरावती येथे सन्मानित करण्यात येणार आहे. मोहन नागपूरकर हे एक समाज सेवक असून, पुसद क्षेत्रामध्ये पासून सामाजिक, १९८१. धार्मिक, राजकीय, क्रीडा, उत्सव,आंदोलने, ईत्यादी क्षेत्रात त्यांचे भरीव कार्य असून विलोभनीय आहे. सर्व समाजस्तरातील सामान्य, गरीब लोकांना जमेल तेवढी मदत, सहकार्य करीत असतात, सर्व सामान्य लोकांना न्याय मिळावा, करिता नेहमी धडपडत असतात. शहरात, गावात एखादे कुठले चांगले व्यक्ती / युवकाने घवघवीत यश प्राप्त केले असेल. तर त्यांचे कौतुक अभिनंदन शुभेच्छा कार्यक्रम घेऊन त्याचे मनोबल वाढवितात. असे कुठलेच क्षेत्र नसेल की त्यांनी कार्य केले नसावे आणि अतिशय सुंदर कार्याची असे अनेक सामाजउपयोगी कार्य त्यांच्या हस्ते घडत आहेत. शहरात, गावात प्रत्येक व्यक्तीसोबत व्यापारी, पुढारी, पत्रकार, लहान,मोठा, गरीब श्रीमंत, युवक वर्ग, कर्मचारी, ईतर लोकांशी त्यांचे सर्वांशी मित्रत्वाचे, जिव्हाळ्याचे संबंध आहे. नाजूक आर्थिक परिस्थिती, मनमिळाऊ स्वभाव, कुणालाही न दुखवीता हसत खेळत भाष्य करणारे व्यक्तिमत्व मोहन नागपूरकर यांना ‘समाज जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याने सर्व स्तरावरुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.



