कारला येथे स्वच्छता अभियान व प्लास्टिक मुक्त मोहिम ;ब्रँड अँबेसिडर राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांचा पुढाकारातून राबविण्यात आले

पुसद – महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दुत राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांच्या द्वारे दि.१३ सप्टेंबर शनिवारी पुसद तालुक्यातील कारला येथे ओंकारेश्वर मंदिर परिसरात व गावात स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक मुक्त अभियान यावेळी राबविण्यात आले आहे .
संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान आनंद दत्त धाम आश्रम माहुर द्वारे ब्रँड अँबेसिडर महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांनी पर्यावरणाचे रक्षण व संरक्षण करण्यासाठी कॅरीबॅगची होळी करून प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प , स्वच्छता अभियान , झाडे लावा झाडे जगवा , बेटी बचाव बेटी पढाव , वेसन मुक्ती, शिक्षण , पाणी आडवा पाणी जिरवा, अशा विविध विषयावर जनजागृती करून पुसद तालुक्यातील कारला येथे महाराष्ट्र शासनाचे स्वच्छतादूत राष्ट्रसंत सदगुरु साईनाथ महाराज यांच्य संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष मंडळी व महाराजांचे शिष्य मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम राष्ट्र गीत घेऊन सुरुवात करून कारला देव मंदिर परिसरात व गावात सर्वत्र ठिकाणी हातामध्ये झाडू घेऊन संपूर्ण परिसर स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे यावेळी परिसरातील कॅरीबॅग, प्लास्टिक कचरा जमा करून त्याची होळी करून नष्ट करण्याचा संदेश देऊन प्लास्टिक मुक्त गाव करण्याची शपथ घेतली आहे यावेळी माहूर येथील जवाहरलाल जयस्वाल , रणवीर पाटील, विष्णू वांझाळ, गजानन कलाने , चिकणे, निळू पाटील, राजेश कुबडे, पिंटू शिंदे, संतोष बाभळे , पंजाबराव माने, पत्रकार प्रशांत देशमुख व परिसरातील भक्त महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




