काऱ्होळ येथुन चार दिवसापासून विवाहित महिला बेपत्ता; ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद च्या हद्दीतील घटना!

पुसद: ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काऱ्होळ येथील विवाहित महिला सौ.सीताबाई सुखदेव डाखोरे हीचे दोन दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या उषा डाखोरे हिच्या सोबत कडाक्याचे भांडण झाले होते. परंतु ते अपसी निपटारा केला होता त्यानंतर दि१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास पतीला दवाखान्यात जायचे सांगून ॲटोत बसून पुसद येथे गेली असता तेव्हापासून ही महिला बेपत्ता झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सौ. सीताबाई सुखदेव डाखोरे वय२८ वर्ष ही महीला पुसद येथे दवाखान्यात जाण्यासाठी आपल्या घरून काऱ्होळ येथून गेली असता ती घरी परतली नाही. तीच्या पतीने तिच्या माहेरी व इतर पाहुण्याकडे शोधाशोध केली तरीही ती अजून सापडली नाही.याबाबत पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महिलेचे पती सुखदेव पांडुरंग डाखोरे वय ३३ वर्षे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसही त्या विवाहित महिलेचा शोध घेत आहेत.बेपत्ता विवाहित महिला सौ.सीताबाई सुखदेव डाखोरे हिची उंची ५ फूट, रंग -सावळा, अंगात साधारण/ मध्यम, केस लांबकाळे, गळ्यात मंगळसूत्र, अंगावर हिरवट पोपटी रंगाची साडी व पांढऱ्या रंगाचे ब्लाऊज, पायात चांदीचे जोडवे व तोरड्या तसेच स्लीपर चप्पल आशा वर्णाची सदर महिला कोणाला दिसल्यास पुसद ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये किंवा. 7972359942, 9529368442, या नंबरवर संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.पण सदर महिलेला दोन लहान मुले असुन महिलेचा शोध न लागल्याने महिलेच्या माहेरची मंडळी त्रस्त आहेत ग्रामीण पोलीस स्टेशनचे संबंधित पोलीस उडवडीचे उत्तर देत असुन नातेवाईकांनी संबंधित पोलिसाना संपर्क साधला असता त्यांनाच आत टाकण्याची धमकी देत असल्याचा आरोप बेपत्ता महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.
सदर बेपत्ता महिलेचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये घरगुती कारणामुळे भांडण झाले होते त्या रागाच्या भरात महिला बेपत्ता झाली असून कोणालाही न सांगता घर सोडून गेली आहे त्या महिलेचे सर्वत्र शोध घेणे व चौकशी करणे सुरू आहे-संतोष बोरखे बीट जमादार ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद,



