Games

आज पत्रकार चषक २०२४ चे आयोजन!

पुसद : आपल्या दैनंदिन व्यवहारातील व कार्यालयातील बरीच कामे ही यंत्र करत असतो. म्हणूनच आपली जीवनशैली सुद्धा बैठी झाली आहे. त्यामुळे खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने व अधिकारी कर्मचाऱ्यांना आनंद उत्सवाची एक संधी म्हणून पहिल्यांदाच पत्रकार क्रिकेट क्लबतर्फे पुसद येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार चषक २०२४ चे आयोजन पुसद शहरातील यशवंत रंगमंदिर मैदानवर आज २० जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड आशिष देशमुख माजी अध्यक्ष महा. ॲड गोवा बार कौन्सील यांचे अध्यक्षतेखाली आमदार इंद्रनील नाईक व पुसद अर्बन बँक, पुसदचे अध्यक्ष शरद मैन्द यांचे हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे डॉ. मोहम्मद नदिम माजी उपनगराध्यक्ष न.प., पुसद, वैभव फुके संचालक रावजी फिटनेस क्लब, पुसद, अनुकुल चव्हाण अध्यक्ष यवत.जि. मध्यवर्ती बँक पुसद, ॲड उमाकांत पापीनवार जिल्हाप्रमुख, शिवसेना व रवि ग्यानचंदानी जिल्हा उपाध्यक्ष भा.ज.पा. तसेच प्रमुख अतिथी म्हणुन सुहास गाडे उपविभागीय अधिकारी, पुसद, डॉ. पंकज अतुलकर सहा. जिल्हा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी पुसद, प्रिया पुजारी कार्यकारी अभियंता सा.बां विभाग, बि.एन. स्वामी उपवनसंरक्षक वनविभाग पुसद, प्रकाश झळके उपविभागीय अभियंता सा.बा. विभाग, पुसद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

तर दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी अंतिम सामने व विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहेत.   सदरचे सामने हे पत्रकार, शिक्षक, तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या मध्ये होणार आहेत. तरी सर्व क्रीडाप्रेमींनी या आयोजनाचा आनंद घ्यावा असे जाहीर आवाहन पत्रकार क्रिकेट क्लब च्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close