हिवरा येथे चोरीचे सत्र सुरूच पुन्हा दोन दुकानासह जिजाऊ बँक फोडली;१४ हजाराचा ऐवज लंपास!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम)काल १० जुलैच्या सकाळी चार वाजता चे दरम्यान चोरट्यांनी तीन ठिकाणी चोरी करून १४ हजाराचा आवाज ऐवज लंपास केल्याची घटना घडली राष्ट्रीय महामार्ग३६१ वर हिवरा बस स्थानका नजीक ईजनी रोड वरील जिजाऊ अर्बन बँक मध्ये दुकानाचे सेटर वाकून चोरट्याने आत प्रवेश केला मात्र चोरीचा प्रयत्न निष्फळ ठरला नंतर चोरट्यांनी जिजाऊ अर्बन बँकेला लागून असलेल्या कुलश्री मेडिकल मध्ये त्याचप्रमाणे शटर वाकून आत प्रवेश केला ड्रॉप मधील असलेली रोख रक्कम १४ हजार रुपये लंपास केली हायवे रोडला लागून असलेले किशोर खंडेलवाल यांच्या दुकानांमध्ये शटर वाकवून आत प्रवेश केला व दुकानातील काजू, बदाम सोनपापडी व चिवडा पाकिट एवढ्यावरच समाधान मानले मात्र चोरटे चोरी करतअसताना सीसीटीव्ही मध्ये
कैद झाले सदर घटनेची तक्रार महागाव पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून स्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते परंतु श्वानतिथेच घुटमळल्याने मार्ग दाखवू शकले नाही या सलग घडणाऱ्या चोरीमुळे व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली आहे तीन महिन्यापूर्वी अशोक जैस्वाल यांच्या घरी चोरट्यांनी साडेआठ लाखाचा ऐवज लंपास केला होता अजय कदम या अल्पभूधारक शेतकऱ्यांची नाल्यावरील मोटर चोरट्याने दोनदा लंपास केली याची रीतसर तक्रार स्टेशनला देऊन सुद्धा आरोपी सापडले नाही त्या घटनेची शाई वाळते न वाळतेन पंधरा दिवसा पूर्वी एकविरा नगर मधील मोतीराम भैसे यांच्या घरी भरदिवसा चोरट्यांनी चोरी करून अंदाजे ९० हजाराचा ऐवज लंपास केला होता.
मात्र या चोरीचा शोध पोलिसांना लागलाच नाही कोणत्याही सुगावा सुद्धा महागाव पोलिसांना लागला नाही सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेल्या मध्ये सहा चोरटे असल्याची दिसून येत आहे या घटनेचा तपास डीवायएसपी विनायक कोते दीपक ढोमणे, यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार विलास राठोड, सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करत असून हिवरा संगम येथील सलग झालेल्या या एकाही चोरीचा तपास महागाव पोलीस लावू शकले नाही त्यामुळे महागाव पोलिसा विषयी व्यापारी वर्गासह गावकऱ्यात रोश पाहायला मिळत आहे.



