जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात अनोखे ‘वृक्षाबंधन’!

पुसद:भारतीय संस्कृती रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते.हातावर राखीचा रेशमी धागा बांधल्यानंतर भावाने बहिणीचे रक्षण करावे, ही भावना त्यामागे असते.हाच रक्षाबंधनाचा सण जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनोख्या प्रकारे साजरा केला.विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शाळेतील वृक्षाच्या खोडाला मोठ्या आकाराची राखी बांधून खऱ्या अर्थाने वृक्ष बंधन साजरे केले व पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारली.भारतीय सण हे निसर्गाधिष्ठीत आहेत. यामागे निसर्ग रक्षणाचा विचार आहे.नेमका तोच सकारात्मक विचार पुढे नेत .हरित सेनेच्या नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या त्याच्या प्रांगणातील विविध झाडांना बांधल्या व वृक्षांप्रती प्रेम व्यक्त केले.या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन व रक्षणाचा संदेश दिला.या उपक्रमाचे मुख्याध्यापक डॉ. माधवी गुल्हाने यांनी कौतुक केले.
शाळेच्या प्रांगणातील वृक्षाला राखी बांधताना उपस्थित विद्यार्थ,मुख्याध्यापक डॉ. माधवी गुल्हाने व शिक्षिका
या उपक्रमाच्या यशासाठी इयत्ता नववीच्या रक्षा चव्हाण, सलोनी मोरे, गौरी मोरे, सुस्मिता राठोड, सेजल इंगळे, वैष्णवी भांडवले, वैष्णवी सौंदिया, रेणुका बोखारे, प्रतीक्षा खांडसुळे, मेघा मुकुटकर, संतोषी वंजारे, यश ढगे, कार्तिक ढगे, शुभम राठोड, तसेच आठवी इयत्ता च्या धनश्री राठोड, चंचल कांबळे अनमोल बीजमवार, आरती जगताप, प्राची मांडवगडे यांनी पुढाकार घेतला.या कार्यक्रमासाठी शिक्षिका भारती निगडकर, सोनाली राठोड यांनी सहकार्य केले.



