सामाजिक

जलजीवन मिशनचं काम रखडल्याने सरपंच मंगेश साबळे यांचं अनोखं आंदोलन!

सरपंचाने पाणी प्रश्नासाठी साडी नेसून डोक्यावर कळशी घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर केले आंदोलन!

छत्रपती संभाजीनगर(वृत्तसेवा): जिल्ह्यातला एका सरपंचाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संभाजीनगरच्या गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी अनोखे आंदोलन केले आहे. त्यांनी निषेध नोंदवण्याचा साडी नेसून डोक्यावर कळशी घेत आंदोलन केले आहे. त्यांनी महिलेची वेशभूषेत केलेल्या आंदोलनाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.आज (१ फेब्रुवारी) सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या दालनासमोर महिलेच्या वेषात आंदोलन करायला सुरुवात केली. त्यांनी डोक्यावर कळशी देखील घेतली होती. आंदोलन करताना त्यांनी गावातील महिलांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. प्रतिकात्मक आंदोलन केल्याने ते जिल्ह्यात चर्चेत आहेत.जलजीवन मिशन मागील चार वर्षांपासून पूर्ण न झाल्याची तक्रार मंगेश साबळे यांनी केली. काम पूर्ण न झाल्याने गावातील महिलांना पाणी भरवण्यासाठी वणवण करावी लागते. पिण्याच्या पाण्यासाठी गावकरी पायपीट करत आहेत. महिलांना होणारा त्रास वरिष्ठांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने साडी नेसून आंदोलन केल्याची मागणी साबळे यांनी केली.आंदोलनादरम्यान ते म्हणाले, “नमस्कार. मित्र हो मी सरपंच साबळे बोलतोय. पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालयात मी सरपंच म्हणून आलो नाहीये. तर या ठिकाणी मी माझ्या गावातील महिलांचा आवाज म्हणून आलोय. माझ्या गावातील महिलांना दोन-दोन किलोमीटर चालत जावून पाणी आणावं लागतं. सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आंदोलन केलं. आज दोन वर्ष जवळपास झाली आहे. २०२० मध्ये जलजीवन मिशनचं काम सुरु झालंय. चार वर्ष झालं हे काम पूर्ण झाल नाहीये. उद्घाटन झालं. १ कोटी ८० लाखांचं बजेट लागलं पण अजूनही काम पूर्ण झालं नाही संपूर्ण जिल्ह्यात ही अवस्था आहे. माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी महिलांची अवस्था पोहोचावी म्हणून आज मी असा आलो आहे.मुख्यमंत्री लाडक्या बहीनींना डोक्यावर २ किमी पाणी आणाला लावत आहे. माझ्या गावात ५ वर्षे झाले जलजीवनचे काम सुरू होऊन पण काम होत नाही. यात जिल्हा परिषद सीईओंनी टक्केवारी घेतल्या असाव्यात, असा आरोपही यावेळी सरपंच मंगेश साबळे यांनी केला आहे.

नेमके काय म्हणाले साबळे?

मी सरपंच म्हणून नाही तर माझ्या गावातील महिलांचा आवाज म्हणून आलो आहे. माझ्या गावातील महिलांना दोन किमी जाऊन डोक्यावर पाणी आणावे लागते, गावात पिण्यासाठी पाणी नाही, अशी खंत मंगेश साबळे यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान सरपंच साबळे पुढे म्हणाले की, सुरूवातील शुद्ध पाणी नव्हते म्हणून आरआर बसवून आंदोलन केले आणि लोकांनी मला सरपंच म्हणून निवडून दिले. आज दोन वर्षे झाले २०२१ मध्ये जलजीवन मिशनचे काम सुरू झाले पण अजून ते पूर्ण झाले नाही. त्यासाठी टाकलेले पाईप सडू लागले आहेत पण अजून काम झाले नाही? अजून काम का झाले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतली का?

सरपंच साबळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणता लाडकी बहीण आहे. पण तिला पिण्यासाठी अजून पाणी मिळत नाहीये. चार-चार वर्षे झाले अजून काम होत नाही, अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतली की काय अशी शंका यायला लागली आहे. माझ्या गावातील महिला मला विचारत आहे. सरपंच केले तुला अजून पाणी देऊ शकत नाही. काम कधी पूर्ण होणार. ही स्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. ह्यात भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

पाणी पाजण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची

मुख्यमंत्री लाडक्या बहीनींना डोक्यावर २ किमी पाणी आणाला लावत आहे. माझ्या गावात ५ वर्षे झाले जलजीवनचे काम सुरू होऊन पण काम होत नाही. यात जिल्हा परिषद सीईओंनी टक्केवारी घेतल्या असाव्यात, असा आरोपही यावेळी सरपंच मंगेश साबळे यांनी केला आहे.

सरपंच साबळे म्हणाले की,

ठेकेदाराला जर काम करता येत नव्हते तर त्यांनी हे कंत्राट घेतलेच का. आता ते म्हणत आहे की शासन बजेट देत नाही म्हणत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला विनंती आहे की, तुमच्या लाडक्या बहिनीला पाणी पाजण्याची जबाबदारी तुमची आहे. उन्हाळा सुरू न होताच ही परिास्थिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close