जलजीवन मिशन योजनेच्या पाण्याच्या टाकीचे सुरू असलले निकृष्ट दर्जाचे बांधकामाचा स्लॅब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टाळली!

पुसद:तालुक्यातील पिंपळगाव मुंगशी येथे जलजीवन मिशन योजनेच्या पाणीपुरवठा टाकीचे निकृष्ट दर्जाचे सुरू असलेले बांधकाम दि.२ ऑक्टोंबर २०२३ रोजी स्लॅबसह सेट्रिंग कोसळी सुदैवाने या घटनत कोणतीही जीवित हानी झाली नाही कामगारांना मात्र मुका मार लागल्याची माहिती असून सदर घटनेची तक्रार गावातील नागरिकांनी गट विकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना ‘हर घर जल’ या संकल्पनेसह भारत सरकारने २०२४ पर्यंत भारतातील सर्व ग्रामीण कुटूंबांना नळ कनेक्शन द्वारे पुरेसे पाणी सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जल जिवण मिशन योजना सुरु केले. परंतु पुसद तालुक्यातील गावात नागरीकांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे यासाठी जल जिवन मिशन अंतर्गत कोट्यावधी निधी शासनातर्फे मंजुर करण्यात आले आणी कंत्राटदाराला कंत्राट देतांना शासनातर्फे घालुन दिलेल्या अटी व शर्तीना फाट्यावर मारण्याचे काम करण्यात आले आहे.संपूर्ण तालुक्यात जल जीवन मिशन या योजनेमार्फत पाण्याची टाकीचे कामे सुरू आहेत. तालुक्यात जल जीवन मिशन च्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू असून या योजनेच्या कामाचा निधी व्यर्थ जाण्याच्या मार्गावर आहे. या योजनेतून सुरू असलेले कामे नवखे कंत्राटदार करत असून ज्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभागामार्फत कंत्राट दिले जाते त्याची माहिती गावातील नागरीकांना, सामाजीक कार्यकर्त्यांना सूध्दा राहत नाही. हे कंत्राटदार शासनाने दिलेल्या अटीनुसार व शर्तीनुसार बांधकाम करीत नसून टाकीचे फाउंडेशन जालीचा लोहा बांधणी ही शेड्युल बी (इस्टीमेट) नुसार करीत नसल्याचे दिसून येत आहे तर अनेक बांधकामावर माती मिश्रीत रेती, सिमेंट हे अतिशय निकृष्ट दर्जाचे वापरण्यात येत असल्यामुळे जल जीवन मिशन योजनेतील नवीन पाण्याचा टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्या जात आहे या बांधकामावर कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याने या कंत्राकदाराची मनमानी सुरू आहे. त्यामुळे या योजनेतील निधीचा बोजवारा उडाला पिपळगाव मुंगशी येथील पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळल्याने तालुक्यातील या योजनेतील बांधकामांची काय परिस्थिती आहे ते समजते त्यामुळे निकृष्ट दर्जाचे कामे करणारे अधिकारी कंत्राटदार अभियंते यांच्या कामाची सखोल चौकशी करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे