विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय चिखल दिवस साजरा!

पुसद: शहरातील आधुनिक शिक्षण क्षेत्रातअल्पवधीतच नावलौकिक मिळविलेल्या विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलमध्ये पोदार प्रेप स्प्लीश, स्प्लॅश लेट्स मेक अपमडी मॅश या थीम अंतर्गत आंतरराष्ट्रीय चिखल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हा एक मजेदार आणि उर्जावर्धक कार्यक्रम आमच्या मुलांसाठी अनोख्या पद्धतीने शिकण्याची आणि खेळण्याची एक अद्भुत संधी होती. कार्यक्रमाची थीम होती : स्प्लिश, स्प्लॅश, लेट्स मेक अ मडी मॅश! NCF-2022 च्या पंचकोशाच्या संदर्भात आम्ही नेहमीच सर्व कार्यक्रम आणि सण साजरे करतो कारण यामुळे आम्हाला सर्वांगीण विकासासाठी आवश्यक घटकांचे पालनपोषण करण्यास मदत होते. प्रि प्रायमरी मधिल विद्यार्थ्यांकरिता व त्यांच्या पलकांकरिता विविध ॲक्टिव्हिटी ठेवण्यात आल्या होत्या. (नर्सरी), (ज्युनियर किंडरगार्टन) (सीनिअर किंडरगार्टन): मैदानी ॲक्टिव्हिटी: चिखलाचे पाय, मड टग ऑफ वॉर, मड ट्रेझर हंट आणि चिखलात फुटबॉल खेळ खेळला गेला.यावेळी पालक आणि मुलांनी मोठ्या उत्साहात चिखलात खेळण्याचा आनंद लुटला. मुलांना चिखलात खेळण्याची संधी देऊन त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. संपूर्ण जगात खरोखरच चिखल होऊन आणि निसर्गाचे निरीक्षण करून, घराबाहेरील क्रियाकलापात आंतरराष्ट्रीय चिखल दिवस साजरा करण्यात येतो. सदर उद्दिष्टे ठेऊन विद्यालंकार्स पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून मुलांना पालकांसोबत चिखलात खेळण्याची आणि मजा करण्याची संधी उपलब्ध करून हा चिखल दिवस साजरा करण्यात आला या आंतरराष्ट्रीय चिखल दिवसाचे औचित्य साधत शाळेतर्फे विद्यार्थी आणि पालकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.हा प्रत्येक पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी खरोखरच एक अविस्मरणीय अनुभव होता.