श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचे थाटात उद्घाटन
राष्ट्रीय सेवा योजना हे संस्कार पीठ आहे: --राजाराम जाधव

पुसद- स्थानिक श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना ग्रामीण विशेष शिबिराचे दत्तक ग्राम लोणी येथे थाटात उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य रामचंद्र हिरवे, उद्घाटक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक ,कवी, लेखक राजाराम जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच अनिल रत्ने, माजी सरपंच किशोर काळे, रेश्माजी बोडके, किशोर बोडके, पोलीस पाटील विवेकानंद कांबळे, ग्रा.पं सदस्य स्वाती मनवर, न्यूज रिपोर्टर भैय्यासाहेब मनवर, गजाभाऊ भगत, विचारपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक राजाराम जाधव यांनी फीत कापून शिबिराचे रितसर उद्घाटन केले मान्यवरांच्या स्वागतानंतर स्वाती सूर्यवंशी हिच्या स्वागत गीताने व छकुली राठोड हिच्या रासेयो प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक भाषणातून जिल्हा समन्वयक प्रा गजानन जाधव यांनी शिबिर आयोजित करण्याची भूमिका व शिबिरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची तथा कार्यक्रमाची माहिती दिली. उद्घाटक राजाराम जाधव आपल्या भाषणात म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना हे संस्कार पीठ आहे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त ,स्वावलंबन निर्माण करण्यात राष्ट्रीय सेवा योजनेची महत्त्वाची भूमिका आहे त्यातून स्वयंसेवकांनी मधील सुप्त कलागुणांना चालना देण्याचे काम प्रकर्षाने होताना दिसते यातून देशाचे जबाबदार नागरिक घडविल्या जातात. हो जाओ तयार साथियो हे स्फूर्ती गीत त्यांनी सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रामचंद्र हिरवे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की सेवा ही स्वतः घ्यायची नसते तर सेवा ही दुसऱ्याची करायची असते त्यातूनच नॉट मी बट यु हे राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य तयार झाले आहे आपल्या शरीराला कामाला लावा म्हणजेच ते समाजाच्या उपयोगी पाडण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय सेवा स्वयंसेवकांच्या रोमा रोमात भरलेली असते. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मनाली गायकवाड तर कार्यक्रमाधिकारी प्रा. भाऊसाहेब देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रा. विक्रम ठाकरे ,प्रा.अर्चना पाल, प्रा.योगिता काष्टे, प्रा. आसिफ शेख, प्रा. अमोल राठोड विद्यार्थी प्रतिनिधी गौरव गायकवाड ,जयश्री चव्हाण, शिवानी गावंडे ,कल्याणी खणके, संकेत राठोड, शुभम जाधव ,अभिषेक खनके यासह सर्व स्वयंसेवक प्रयत्नशील आहेत.