धक्कादायक! पुसद मध्ये निर्दयतेचा कळस स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळले

पुसद:अद्यापही समाजाची मानसिकता बदलली नसून मुलगी झाली तर तिला एकतर पोटातच मारून टाकायचे नाहीतर जन्मानंतर अशीच एक घटना काल शहरात घडली एका स्त्री जातीचे अर्भक एका नालीत फेकून निर्दयतेचा कळस गाठला.पुसद शहरातील शिवाजी वार्डातील तीन पुतळा जवळील नालीत दि.१६ जून २०२३ रोजीच्या सकाळी ९.३० च्या सुमारास नालीची साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला सांडपाण्याच्या नालीत दिसून आले. एक स्त्री जातीचे अर्भकअनोळखी व्यक्तीने फेकून निर्दयतेचा कळस गाठला. सदर अभ्रक हे मृतावस्थेत सापडले असून शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अभ्रकाला बाहेर काढून ताब्यात घेतले. सदर अर्भक कोणी फेकले याचा तपास शहर पोलीस स्टेशन पोलीस करणार आहेत.शहर पोलीस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील शिवाजी वार्डातील तीन पुतळा परिसरातील नालीत दि.१६ जून २०२३ रोजीच्या सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान नगर परिषदचे कर्मचारी नितीन नकवाल शिवाजी वार्डातील तीन पुतळ्या जवळील नाल्याची साफसफाई करत असताना त्यांना एका स्त्री जातीचे तीन महिन्याचे अर्भक आढळून आले. त्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ ही माहिती शहर पोलीस स्टेशनला दिली.त्यानंतर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.असुन नगरपरीषदेच्या सफाई कर्मचाऱी नितीन संतोष नकवाल वय २७ वर्षे रा.नवल बाबा वार्ड यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात महिलेविरोधात विविध कलमान्वये दि.१६ जून २०२३ रोजीच्या दुपारी २.१४ वाजता गुन्हे दाखल करण्यात आले आहे.यावेळी त्यांना तीन महिन्यांचे स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने अभ्रकाला माती व चिखलाने माखलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एका स्त्री जातीचे अर्भक एका नालीत फेकून निर्दयतेचा कळस गाठला आहे.