पुसद तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात अवैध गुटखा बंदी कायदा नावालाच;सुदर्शन नगरमधील गुटख्याच्या गोण्या कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने खुलेआम विक्री सुरू!

पुसद:आरोग्यास हानिकारक असल्यामुळे गुटखाबंदी असताना तालुक्यासह शहरामध्ये सर्रास अवैध गुटखा विक्री सुरू आहे. तालुक्यात व शहरात तंबाखू, गुटखा विक्री बंदीचा कायदा नावालाच दिसून येत आहे. शहरांसोबत गावागावांत खुलेआम पानटपऱ्यांवर तंबाखू व गुटख्याची विक्री होत आहे. एवढेच नव्हे तर शाळा कॉलेज परिसरालगत ही दुकाने पानटपऱ्या खुलेआम अवैध गुटखा विक्री करीत आहेत.तर सुदर्शन नगरमधील गुटख्याच्या गोण्या कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने खुलेआम विक्री केल्या जात असल्याने गुटखा विक्रेत्याचे मनोबल वाढले आहे.त्यामुळे अन्न व औषध प्रशासन धडक मोहीम राबविणार काय, असा प्रश्न जनतेला पडला आहे.राज्यात गुटखा बंदीचा निर्णय झाला. त्याला बारा वर्षे पूर्ण झाली; पण ना त्याची कडक अंमलबजावणी आज पर्यंत सुरू न झाल्याने “ना गुटखा विक्री थांबली” शहर किंवा ग्रामीणमधील पानटपरी, दुकानांमध्ये गुटख्याची विक्री होत आहे. गुटखा विक्री होत असतानाही कारवाई होताना दिसत नाही. आंतरराज्यीय सीमांवर तसेच स्थानिक पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त असताना तसेच स्थानिक गुन्हे शाखा हे २४ तास ऑन ड्युटी असताना पोलिसांचे तपासणी नाके असतानाही पुसद शहरात गुटखा येतोच कसा, कोट्यावधी रुपयाचा गुटखा पुसद शहराला लागून असलेल्या सुदर्शन नगरच्या गोडाऊन मध्ये उतरविला जातो कसा? तरी या गोडाऊन मधून ग्रामीण भागात व शहरात गुटखा पुरवठा केला जातो कसा! याकडे स्थानिक पोलीस प्रशासनाने स्थानिक गुन्हे शाखेकडून तसेच अन्न व औषध प्रशासनाने धृतराष्ट्राचे सोंग घेतल्याचे चित्र पाहायला मिळत परंतु या प्रश्नाचे ठाम उत्तर कोणताही वरिष्ठ अधिकारी अधिकारी देऊ शकत नाहीत.पुसद शहराला लागून असलेल्या गायमुख नगर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सुदर्शन नगर येथील गुटखा माफिया इम्तियाज खान अरबाज खान यांनी लाखो रुपयांचा अवैध गुटख्याची खुलेआम विक्री सुरू केली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरामध्ये इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्रीला येतो. गुटखा बंदीनंतर अनेकांनी मावा विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला. त्यातूनच गुटख्याची विक्री सुरुवातीला चोरून केली जात होती. आता सर्रासपणे पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून ही विक्री केली जात आहे. तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवून निरोगी, सदृढ समाजाच्या निर्मितीसाठी अवैध गुटखा, मावा विक्रीवर कडक निर्बंध लावण्यात आले; पण शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे कायद्याचे पालन होत नाही. तालुक्यासह शहरात नव्हे, तर ग्रामीण परिसरात गुटखा विक्री सर्रासपणे पानटपरी, दुकानांमध्ये होते. गुटखा विक्रीसाठी व्यापाऱ्यांची मोठी साखळी कार्यरत आहे. ही साखळी तोडल्यानंतरच गुटखा विक्री कमी होण्यास मदत होणार आहे. कारवाईची धडक मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. पण स्थानिक पोलीस या घटका माफियाकडून चिरीमिरी घेऊन मुख समिती दिली काय असा प्रश्न सर्वसामान्य पडला आहे. या अवैध गुटक्यामुळे अनेक तरुणांच्या शरीरावर दुष्परिणाम जाणवत आहेत हे व्यसन तरुणांना सुटता सुटेना तंबाखू, गुटख्याचे परिणाम अनेकांच्या आरोग्यावर झाले आहेत. गुटखा खाणाऱ्यांचे तोंड उघडत नाही. अनेकांना व्यवस्थित जेवणही करता येत नाही. आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. तरुणांच्या आरोग्यावर तंबाखू, गुटख्याचे सर्वाधिक वाईट परिणाम दिसत असल्याचे कर्करोगतज्ज्ञ सांगतात. तरीपण, गुटखा, मावा खाणाऱ्यांना त्याचा नाद सुटता सुटत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पण येथील अन्न व औषध प्रशासन अधिकारी तसेच स्थानिक पोलीस प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या हप्ते खाऊ धोरणामुळे हा गुटखा माफिया अवैध गुटख्याची विक्री करीत आहे,



