अवैध व्यवसायिकांकडून पत्रकाराला बंदुकीने जीवे मारण्याची धमकी!

उमरखेड/ प्रतिनिधी: पोफाळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डोंगरगाव येथील पत्रकार प्रशांत देशमुख हे प्रशासनाला अवैध व्यवसायाची माहिती का देतोस या कारणावरून अवैध व्यवसायिकाकडून बंदुकीच्या साह्याने उडवून जीवाने मारण्याची धमकी देण्यात आली असल्याने या प्रकरणी सय्यद मोसिन सय्यद रऊप व सय्यद मुसबीर सय्यद जमील रा. डोंगरगाव यांच्याविरुद्ध पोफाळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की पोफाळी पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगरगाव येथे अवैध रेती व मुरुम तस्कर यांनी दि.१२ जानेवारी रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास पत्रकार प्रशांत देशमुख हे शेतात कामानिमित्त जात असताना डोंगरगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील रस्त्यावर त्यांची मोटरसायकल सय्यद मोसिन सय्यद रऊप यांनी अडवून तु सय्यद मुसबीर सय्यद जमील या माझ्या माणसाच्या रेती व मुरुमाच्या गाड्याची प्रशासनाला का?माहिती दिली असे म्हणत चिडून जाऊन या कारणाच्या संशयावरून व सय्यद मुसबीर सय्यद जमील यांच्या सांगण्यावरून बंदुकीने उडवून जीवाने मारून टाकतो अशी धमकी दिल्याने पत्रकार प्रशांत देशमुख यांनी या प्रकरणी पोफाळी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी डोंगरगावातील अवैध वसायिक रेती तस्करा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रशांत देशमुख यांना रेती तस्करांनी बंदुकीच्या साह्याने जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.



