ईतर

अवैध गौण खनिज प्रकरण डेव्हलपर्स व ले-आऊट धारकांस भोवले ; पाचपट दंड न भरल्यास ही रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल!

सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कांबळे यांनी २०२३ रोजी दाखल केलेल्या तक्रारीच्या पाठपुराव्याला यश!

पुसद : येथील माहूर रस्त्याच्या मार्गावरील लागून असलेले मौजा खंड -२ शेत सर्व्हे नंबर १५/२ क्षेत्र त १.६०हे.आर वर्ग१ मधील जमिनीवर ( चिद्दरवार सिटी) निवासी परयोजनासाठी जमीन मालक डॉ. सतीश चिद्दरवार यांनी ले-आउट मधील विकास कामे करण्याकरिता आशिष अशोक शिरमवार यांना करारनामा करून दिला होता. परंतु या डेव्हलपर्स व ले-आउट धारकांनी या ले-आउट मधील विकास कामासाठी काही प्रमाणात अनधिकृत गौणखनिजाचा वापर करण्यात आल्याने त्यानुसार पुसद तहसीलदार यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम१९६६ चे कलम ४८(७)(८) नुसार ले-आउट धारक व डेव्हलपर्स यांना २ लाख ६२ हजार ४४० इतका पाचपट दंड आकारला असून सदर रक्कम तत्काळ शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत मात्र, संबंधित लेआउट धारक व डेव्हलपर्स कडून दंड न भरल्यास ही रक्कम जमीन महसूलाची थकबाकी नमूद करण्यात येईल व पुसद तहसील कार्यालयाकडून सातबारा उताऱ्यावर दंडात्मक कारवाईचा गौणखनिजाचा बोजा चढविला जाणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आहे.त्यामुळे अनधिकृतपणे अवैध गौणखनिज वापरणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद येथील माहूर मार्गाला दाबून असलेली मौजा पुसद खंड-२ मधील शेत सर्वे नंबर १५/२ क्षेत्र १.६० हे.आर वर्ग-१ जमिनीस उपविभागीय अधिकारी पुसद यांचे फाईल वरील रामाक्र १४/एनएपी-३४/२०२६-१७ मौजा पुसद खंड-२ आदेश पारित दि.११ ऑगस्ट २०२२ नुसार निवासी प्रयोजनाकरिता आकर्षक परवानगी मंजूर झालेल्या ले-आउट परवानगी मधील अटी व नियमानुसार कोणतेही लोक सुविधा न देता प्लॉटची खरेदी विक्री करत असल्यामुळे तसेच विनापरवानगी अवैध गौणखनिज रोड,नालीसाठी वापरल्यामुळे सदर ले-आउट धारकावर दंडात्मक कारवाई करून एनएपी परवानगी रद्द करण्याबाबत दि,२१ सप्टेंबर २०२३ रोजी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांच्या कडे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार लक्ष्मण कांबळे, दिनेश खांडेकर,रवी खरात रा.सर्व पुसद यांनी तक्रार दाखल केली होती.सदर तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार यांनी कार्यालयाचे पत्र क्रं/ अका/प्रस्तुत.२/कावि/१३०४/२०२३दि. १० एप्रिल २०२३ नुसार मंडळ अधिकारी पुसद व तलाठी पुसद खंड-२ यांना स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्यासाठी सूचित करण्यात आले होते त्यावेळी मंडळ अधिकारी पुसद व तलाठी पुसद खंड-२ यांनी दि.१७ ऑक्टोंबर २०२ रोजी संयुक्त अहवाल सादर केला होता की सदर ले-आउट मध्ये रस्ते खडीकरण व नाल्याचे पक्के बांधकाम करून रस्त्याच्या बाजूला विद्युत खांब उभे असल्याचे दिसून आले परंतु गौणखनिज वापरणाऱ्यांसाठी रॉयल्टी बाबत पावत्या ह्या आपल्या स्तरावरून विचारणा करण्यात यावे असा तहसीलदार यांच्याकडे अहवाल सादर केला. या अहवाला वरून लेआऊट धारक डॉ.सतीष वसंतराव चिद्दरवार यांना नोटीस पाठवून सदर ले-आउट मधील गौणखनिज वापरण्यात आलेल्या बाबत रॉयल्टीच्या पावत्या व आपला खुलासा सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले होते.त्यावेळी डॉ. सतीश चिद्दरवार यांनी दि.९ फेब्रुवारी २०२४ रोजी गौण खनिजा बाबतीत ७४ रॉयल्टीच्या पावत्या तसेच दि६जन२०२५ रोजी १२५ राॅयल्टी पावत्या जुळवा जुळव करून जमा करण्यात आल्याने यावरून तहसीलदार यांनी पत्र क्रं./अका/ प्रसतु.१/कावि/९५१/२०२५ दि २ डिसेंबर २०२४ रोजी या पावत्याच्या आधारे उपअभियंता जि.प. बांधकाम उपविभाग पुसद यांना पत्र देऊन पुसद खंड-२ मधील सर्वे नंबर१५/२ क्षेत्र१.६० हे.आर या ले-आउट मध्ये पाहणी करून वापरण्यात आलेल्या गौण खनिजांची मोजणी करण्यात आली त्यावेळी कनिष्ठ अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पुसद यांनी दि.२७ जानेवारी २०२५नुसार पुसद खंड-२ मधील शेत सर्वे नंबर १५/२ क्षेत्र १.६० हे.आर ले-आऊट मधील रोड साठी एकूण कठीण मुरूम १५३.७१ ब्रास तसेच ८० एम एम जाडीचा गिट्टा १०८.४७ ब्रास वापरण्यात आले असल्याने एकूण२५६.१८ ब्रास गौण खनिज वापरण्यात आल्याचे निष्पन्न झाले असा अहवाल तहसीलदार यांना सादर केला.असता त्यावेळी सदर अनाधिकृत गौण खनिज प्रकरणात डॉ.सतीष चिद्दरवार यांनी एकूण दाखल केलेल्या १९९ रॉयल्टी पावत्या पैकी एकूण १२६ पावत्या चे एकूण २१९ ब्रास गौण खनिज व ले-आउट मधील गौण खनिज ब्रास असे २२९ इतके ब्रास मुरूम/ढब्बर/बोल्डर च्या पावत्या गाह्य धरण्यात आल्या होत्या. त्यावेळी मोजणी अहवालानुसार २५६.१८ ब्रास गौण खनिज सदर ले-आउट मध्ये वापरण्यात आलेल्या यापैकी लेआउट धारकांनी सादर केलेल्या वरील तक्त्यानुसार गाह्य पावत्या २९९ इतक्या ब्रास वजा करून तफावतीचे एकूण२७.०० ब्रास गौण खनिज अतिरिक्त लेआउट मध्ये वापर करण्यात आल्यामुळे तफावतीचे एकूण २७.०० ब्रास डब्बर,मुरूम, बोल्डर याचे स्वामीत्वधनांची प्रति ब्रास बाजार भाव स्वामींत्वधनाचे मूल्य-१६२० याप्रमाणे-२७ गुणेला१६२० = स्वामीत्वधनांची एकूण रक्कम ४३७४०-इतकी आणि बाजार भावाचे पाचपट दंड रुपये २,१८ ७००असे एकूण होणारे दंडाची रक्कम २६२४४० ले-आउट धारक डॉ.सतिष चिद्दरवार व आशिष शिरमवार करारनामा धारक यांच्याकडून वसूल करण्याचा आदेश महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७)(८) )नुसार आदेश पारित करण्यात आला आहे. सदर रकमेचा भरणा न केल्यास ही रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल असे आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे विनापरवानगी गौण खनिज चोरी करून वापर करणाऱ्या गौणखनिज माफियांचे धाबे दणाणले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close