सेवानगर( कासारबेहळ) येथे घराला भीषणआग:गरीब मजुरदार कुटुंब उघड्यावर!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):- सेवानगर कासारबेहळ येथील मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवणारे पांडुरंग साहेबराव राठोड वय वर्ष ४० रा. सेवानगर ता.महागाव यांच्या घराला सकाळी ६ च्या सुमारास घराला अचानक आग लागल्याने घरातील अन्नधान्य, कपडे गोठ्यातील कडबा,लाकुड फाटा लहान मुलांची सायकल सर्व जळून जागीच खाक झाली. घरात पाणी तापवण्यासाठी चुलीवर ठेवले
असताना घरच्या बाजूला गोठ्याला आग लागली . तलाठी खडसे यांनी पंचनामा केला असून प्रत्यक्ष पाहणीमध्ये घरातील कपडे लाकुडफाटा, अन्नधान्य, साइकल जळाल्याचे दिसून आले. कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही व कोनालाही दुखापत झाली नाही. यांच्या कुटुंबात पती .पत्नी व तीन मुले असे पाच ५ जणांचे कुटुंब आहे. मीळालेल्या माहीती नुसारअंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.तरी तहसीलदार तथा तालुका दंडाधीकारी या विषयाकडे गांर्भीयाने लक्ष देवून ,नुकसान झालेल्या आगग्रस्त कुटुंबांना ताबडतोब नुसकान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यातर्फे करण्यात येत आहे.
कासारबेहळ गावाला विद्युत पुरवठाकरणारी डीपी मागील दोन महिन्यापासून बंद आहे त्यामुळे गावातील नागरिकांना बाहेर गावी दळणवळणासाठी जावे लागते गावाला सध्या शेती फिडर वरून लाईन चालू आहे वारंवार लोकप्रतिनिधी व विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा गावठाण डीपी मिळाली नाही आज अचानक पांडुरंग राठोड यांच्या घराला आग लागली आग विझवण्यास खूप अडचण गेली मी स्वतः गावकऱ्यांच्या मदतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले-सौ. सुलोचना शरद राठोड (सरपंच कासारबेहळ)



