ईतर

हिवळणी येथील इसमाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू!

पुसद: शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनेत लक्षणीय वाढ होत आहे. दर एक दिवसाच्या अंतराने कुठे ना कुठे अपघात झाल्याची घटना घडत आहे.दोन दिवसा अगोदर काटखेडा व कासोळा येथे भीषण अपघात घडले या घटनेला४८ तास उलटले असताना आज निंबी जवळील भवानी टेकडी जवळ एका अपघातात  हिवाळी (त) येथील दुचाकीस्वाराचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव मनोज बळीराम आडे वय ३६ वर्ष रा.हिवळनी(त) ता. पुसद जि. यवतमाळ असे आहे.

याबाबत पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की , आज दि.६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी अंदाजे ९:०० वाजण्सुयाच्या सुमारास हिवळणी येथील रहिवासी असलेले माजी सरपंच मनोज बळीराम आडे वय ३६वर्ष हा मुलांच्या शिक्षणासाठी पुसद येथे राहत होता. तो सकाळी पुसद वरून हिवाळी येथे आपल्या होंडा यूनिकॉर्न दुचाकी क्रमांक एम एच २९सिजी १७७०गावी जात असताना शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबी जवळील भवानी माता मंदिर टेकडीच्या समोरच्या वळणाच्या रस्त्यावर या दुचाकीस्वराचे गाडीवरील  नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट रस्त्याच्या खाली गेली. व दुचाकीस्वार दगडावर जाऊन आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती स्थानिक प्रथम दर्शनीनी वसंत नगर पोलीस स्टेशनला कळवली असता पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू नालमवार व पोलीस हेड कॉन्स्टेबल ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला.असता या अपघातात मृत्युमखी पडलेल्या  इसमाची ओळख पटवली व मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. जर सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्यामार्फत रस्त्याच्या काठेला सुरक्षा भिंत किंवा कठडे लावले असते , तर हा अपघात एवढा भीषण झाला नसता. हे सुद्धा तेवढेच सत्य. घटनेचा उर्वरित तपास वसंत नगर पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close