आरोग्य शिबिर: पुसद शहरात तानाजी जाधव अध्यक्ष म.रा.टायगर ग्रुपच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिरात १७३रूग्णांची तपासणी!

पुसद : शहरात टायगर ग्रुप व आयकॉन हॉस्पिटलच्या वतीने तानाजी जाधव महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप चे अध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या निमित्त घेण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले आहे.
यावेळी १७३ रुग्णांची तपासणी करण्यात आली.हे मोफत शिबिर पुसद शहरातील विटावा वार्ड स्वर्गीय फायबर चव्हाण नगरपरिषद शाळा क्रमांक आठ येथे आयोजित केले होते.
या शिबिरात सर्वरोग निदान करण्यात आले.या शिबिरासाठी आयकॉन हॉस्पिटल पुसदचे या शिबीरसाठी डॉ.आदित्य बजाज MD.DrNB Cardiology ) डॉ.राहुल जाधव एमडी. Medicine. डॉ.अरुण राठोड (BDS) दंतरोग व मुखरोग तज्ञ डॉ. पोलाने. जनरल. फिजिशियन डॉ.सचिन (बालरोग तज्ञ ) यांनी तपासणी व मार्गदर्शन केले.या शिबिर मध्ये १७३ रुग्णाची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी शुगरचे २३ रुग्ण बीपी.चे रुग्ण आढळून आले.बाकी इतर रुग्ण १५० किरकोळ आजाराची रुग्णाची तपासणी करण्यात येवून गरजूना मोफत औषध वाटप केले तसेच शासनाची शासकीय महात्मा ज्योतिबाराव फुले जन आरोग्य योजनेची माहिती देण्यात आली व या शिबिरातील ७ते८ रुग्णांना लाभ देण्यात येणार असल्याचे महीती दिली.यावेळी टायगर ग्रुप पुसद मित्र मंडळाच्या वतीने अथक परिश्रम घेऊन हे शिबिर यशस्वी करण्यात आले. या शिबीस प्रमुख उपस्थिती :- यशभाऊ ज्योतिबा खराटे या शिबिराचे मुख्य आयोजक टायगर ग्रुपचे सर्व अधिकारी पदाधिकारी युवराज कांबळे,पै.विष्णू गुद्धटवार,बाळू ठाकूर,सुनिल पवार,विजय कोरडे,अनिल चव्हाण,सागर चव्हाण,अभिषेक गंगमवार,वीरू वडस्कर, भूषण जाधव,सागर बोपचे,निर्भय पवार,राहुल कुरील,अर्जुन बलखंडे,आशिष काळीकर,हरीश शिंदे,मिलिंद वायकुळे,संतोष कांबळे,गोलू गायकवाड,सुरेश बिडकर सर्व उपस्थित होतेआमचे मार्गदर्शन विष्णू भाऊ शिकारेआरोग्यदुत:-राहुल राठोड वैद्यकीय मदत कक्ष यवतमाळ जिल्हा समन्वयक. ) टायगर ग्रुप यांनी आयकॉन हॉस्पिटलचे आभार व्यक्त केले. रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा.