हरविलेले मोबाईल शहर पोलिसांनी शोधुन मूळ मालकांना केले परत!

पुसद:मोबाईल आता जीवनाचा अविभाज्य अंग झालाय. मोबाईलवाचुन राहणं अनेकांना कठीण आहे. अशा परिस्थितीत मोबाईल हरवला तर त्याच मोठं दुःख असतं. सोबतच हरवलेला मोबाईल पुन्हा मिळेलच, याची शास्वती फारच कमी असते. मात्र अशा परिस्थितीत आपला हरवलेला मोबाईल परत मिळाला तर खुशीला पारावर राहत नाही. असंच काही पुसद शहर पोलीस स्टेशनमध्ये घडलं. पोलिसांनी हरविलेले आणि चोरी गेलेले मोबाईल शोधून काढले. आणि त्यावर कागदी कारवाई करत सगळे मोबाईल त्या मूळ मालकांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केलेत. यावेळी आपला हरवलेला मोबाईल मिळाल्याने मोबाईल मालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद झळकत होता.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,पोलीस स्टेशन पुसद शहर येथे मागील काही दिवसांपासून मोबाईल मिसींगचे प्रमाण वाढले होते या गोष्टीचे गांभीर्य ओळखून पोलीस स्टेशन पुसद शहर ठाणेदार उमेश बेसरकर यांनी डि.बी.प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, म.पो.ना. प्रज्ञा सातव, पो. कॉ. वैजनाथ पवार यांचे पथक तयार करून योग्य ते मार्गदर्शन करून सदर मिसींग मोबाईलचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या, त्या सुचना प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व टिम ने पुसद शहर पोलीस स्टेशन येथील मागील काही दिवसांत दाखल मिसींग मोबाईलचा आढावा घेवून व सायबर शाखा यवतमाळ यांचे मदतीने तांत्रिक दृष्टया सदर मिसींग मोबाईलचा शोध घेत असताना सदर मिसींग मोबाईल पैकी काही यवतमाळ, हिंगोली, वाशीम, वर्धा जिल्हयामध्ये बेस झाल्याने त्या ठिकाणचा योग्य तो पाठपुरावा करून योग्य ते कौशल्य वापरून सदर मिसींग मोबाईलचा शोध घेवून सदर मोबाईल ताब्यात घेण्यात आले सदर मिसींग मोबाईल पैंकी एकूण १९ मिसींग मोबाईल हे ताब्यात मिळाल्याने सदर मिसींग मोबाईलचे ११ तक्रारदार यांना आज रोजी दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी पोलीस स्टेशन पुसद शहर येथे बोलावून मा. सहायक पोलीस अधिक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी पुसद पंकज अतुलकर साहेब व ठाणेदार पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे हस्ते मुळ मालक तक्रारदार १) प्रशांत माधवराव नाईक रा. पुसद, २) दत्तात्रय लक्ष्मण शिकारे रा. बान्सी, ३) सिध्देश्वर बालाजी मंदाडे रा.खडकदरी, ४) आयुष अनुप जैस्वाल रा. पुसद, ५) तस्लीम कौशस शेख मुर्तुजा रा. पुसद, ६) भारतसिंग गोविंद मोरे रा. इसापुर, ७) तथागत बळीराम राठोड रा. मोहा, ८) दिलीप बळीराम राठोड रा. हिंगोली. ९) प्रविणकुमार बळीराम मोरे रा.हार्षी, १०) संतोष ठाकूर रा. पुसद, ११) रघुनाथ अल्लडवार रा. बोरी मुखरे या सर्वांना त्यांचे मोबाईल आहे त्या सुस्थितीत ताब्यात देण्यात आले, आपले मोबाईल मिळाल्याने सदर नागरिकांनी पुसद शहर पोलीसांबाबत धन्यवाद व्यक्त करून आनंद व्यक्त केला आहे.तरी सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड यवतमाळ, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप तसेच सहायक पोलीस अधिक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी पुसद पकंज अतुलकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे सुचना प्रमाणे डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, म.पो.ना.प्रज्ञा सातव, पो. कॉ. वैजनाथ पवार त्यांनी केली आहे..



