क्राइम

गुटख्याचा साठयासह आरोपी ताब्यात!वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना; स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची मोठी कारवाई!

पुसद : यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत. दि२ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना सायंकाळी १९/०० वाजण्याचे सुमारांस पोलीस स्टेशन वसंतनगर हददीतील मधुकर नगर येथील इसम नामे शेख जाकीर शेख इस्माईल हा त्याचे घरी व पानटपरीत महाराष्ट्र राज्य प्रतिबंधीत गुटखा, सुगंधीत पान मसाला विक्री करण्याकरीता साठवून ठेवला आहे. अशी मुखबीरव्दारे खात्रीशिर माहीती मिळाल्याने सदर माहीती नमूद खालील पोलीस अधिकारी यांनी वरिष्ठांना व अन्न सुरक्षा अधिकारी यांना कळवून नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचा समक्ष मधुकर नगर येथे जावून शेख जामीर शेख इस्माईल यांचे पानटपरी व घराची झडती घेतली असता त्याचे घरात व पानटपरीत महाराष्ट्र राज्य प्रतिबंधीत वेगवेगळया कंपनीच्या गुटखा सुगंधीत पान मसाला एकूण किंमत३६,९२५/- रु मुददेमाल मिळून आल्याने ते जप्त करुन ताब्यात घेवून अन्न सुरक्षा अधिकारी यवतमाळ यांनी इसम नामे-शेख जाकीर शेख इस्माईल वय ५२ वर्ष, रा. मधुकर नगर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन वसंतनगर येथे कलम१२३, २७४, २७५,२२३ भान्यास सह कलम मानवी सेवनास अपायकारक व प्रतिबंधक अन्न पदार्थ विक्री करीता साठवणूक करणे सबंधी अन्न व सुरक्षा मणके कायदा २००६ नियम व नियमाने२०११ कलम २६ (२), २७ (३), (ई) सह वाचन ३० (२) (ए) चे उल्लघंन करुन ५९ चा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करुन पुढील तपास कामी पो स्टे वसंतनगर यांच्या ताब्यात दिले. सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो.से) अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो.से) सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी. जे.पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि धिरज बांडे, पोउपन ि शरद लोहकरे, सफो मुन्ना आडे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close