पुसद येथे गुरुपौर्णीमा सांस्कृतिक उत्सव-२०२४ संपन्न!

पुसद :स्थानिक नादब्रम्ह संगीत विद्यालय श्रीरामपुर पुसद व नादब्रम्ह संगीत सेवक क्लासेस मोतीनगर पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा सांस्कृतिक उत्सव२०२४ जेष्ठ नागरिक विरंगुळा केन्द्र पुसद येथे दि. ४ ऑगर २०२४ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात अध्यक्षस्थानी श्री मुंकुदजी रायपुरकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री प्रकाशजी लामने सर, श्री. संजयजी कोरटकर सर, श्री मनिषभाऊ राजुलवार ई. उपस्थित होते. यामध्ये पंधरा समुहानी आपले गायन व वादनाचे सादरीकरण केले. यामध्ये पुणे येथील सुप्रसिद्ध गायक श्री. मयुरजी महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रामध्ये अध्यक्षस्थानी कविवर्य तथा कृषी भुषण श्री. दिपकभाऊ आसेगावकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून समाजसेविका सौ. मोहीनी ताई इंद्रनिल नाईक, सुप्रसिद्ध गायक मयूर महाजन, प्राचार्य श्री विश्वनाथजी वाघमारे, उमरखेड, श्री. कौस्तुभ धुमाळे सर, श्री. स्वप्नील चिंतामनी सर, प्रा. डॉ. साधना मोहोड ई. मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संगीत क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याकरिता व पुढिल वाटचाली करिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, मान्यवरांनी दरवर्षी गुरु पौर्णिमा उत्सव पुसद नगरीत व्हावा यासाठी नादब्रम्ह संगित विद्यालयास शुभेच्छा दिल्या, तसेच श्री दिपकभाऊ असेगाकर यांनी पुढील गुरु पौर्णिमा उत्सवा करिता नादब्रम्ह सांगत विद्यालयास २१००० /-रु. देणगी दिली. श्री. कौस्तुभ धुमाळे व श्री. स्वप्निल चिंतामणी यांनी प्रत्येकी ५०००/-रु. देणगी दिली. मनोगता नंतर सुप्रसिद्ध गायक श्री .मयुरजी महाजन यांच्या शास्त्रीय उपशास्त्रीय सुगम संगीत गायनाचा बहारदार कार्यक्रम झाला. यामध्ये त्यांनी आपल्या प्रभावी गायन शैलीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वी करीता सर्वश्री राजेंद्र महाजन ‘श्रीधर झरकर ‘गजानन दाभाडे , प्रविण पाझारे, हितेंद्र भट्टी ‘ राजकमल कापशिकर ‘ऋषीकेश इंगळे ,किशोर पवार,आशिष तुनगर,अक्षय पैठणकर, भोलाप्रसाद झाडे, सोहन मोरे, ऋषीकेश सोनार, मुकेश राठोड, मारोती मुंडकर, परळीकर, नगराळे तसेच सौ . उज्वलाताई झरकर, सौ अरुणाताई जयस्वाल, सौ. वर्षाताई आत्राम, सौ शिल्पाताई हुलगे, कु. देवश्री काळबांडे यांच्यासह सर्व विद्यार्थ्याचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट व रसाळ, कौतुकास पात्र असे सुत्रसंचालन ह.भ.प.श्री नवनाथ बोराडे लातूरकर यांनी केले. आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक श्री प्रमोदजी जयस्वाल व श्री प्रशांतजी आत्राम यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. सर्व दात्यांच्या सदैव ऋणात राहु आणि यापुढेही भव्यदिव्य कार्यक्रमाच्या आयोजनाचा संकल्प केला.एकंदरीत पुसद नगरीत शास्त्रीय गायनासह गुरुपौर्णिमा सांस्कृतिक उत्सव २०२४ यशस्वीरित्या संपन्न झाला अशी माहीती नादब्रम्ह संगीत विद्यालय पुसदच्या वतीने श्री प्रमोदजी जयस्वाल व श्री प्रशांतजी आत्राम यांनी दिली आहे.



