काळी (दौ ) येथे शक्ती पंप कंपनीकडून मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम संपन्न!

काळी (दौ)/ प्रतिनिधी( संदीप ढगे): महागांव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या काळी ( दौ.) येथे शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाची योजना असलेल्या सौर कृषी पंप विषयी मार्गदर्शन काळी (दौ.) येथील प्रगतशील युवक शेतकरी वैभव गोकुळ कौटीकवार यांच्या शेतात शक्ती पंप कंपनीकडून यशस्वीरित्या मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम आज दि.२६ सप्टेंबर २०२३ ला कार्यक्रम संपन्न झाला.
यात मोलाचे मार्गदर्शन शक्ती सौर कृषी पंपाचे यवतमाळ जिल्ह्याचे वेंडर श्री विपीनभाऊ दिलीप बोमेनवार यांनी आलेल्या शेतकरी बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले. शासनाच्या वतीने राबवल्या जात असलेल्या ९०% ते ९५% टक्के अनुदानावर आधारित सोलर पंप योजनेच्या संदर्भात मार्गदर्शन शिबिर व शक्ति कृषी सौर पंपाचा प्रात्यक्षिक करून दाखविले कार्यक्रमासाठी जवळपास खेड्यातून शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दर्शवली
काळी ( दौ.)चे सरपंच सौ निशाताई संतोष राठोड संतोष भाऊ राठोड पोलीस पाटील प्रकाशभाऊ दवणे ओम कौटिकवार इंद्रजीत कुलदीपके माधव भोने तसेच नितेश भाऊ जाधव जगदीश बोमेनवार नितीन गुंजकर आकाश नेतनकर राहुल देशट्टीवार उमेश कसारे मोरेश्वर जाधव प्रसाद कौटिकवार राजू चिकटे पंकज चिकटे नागेद्र पालकर सिकंदर बनचरे प्रदीप तायडे सुरेश मंदाडे हनुमान मदने संदीप ढगे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.



