आई बनाबाई भगत यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त अनेक मान्यवरांच्या वतीने अभिवादन!

महागाव/प्रतिनिधी ( संदीप कदम) आई बनाबाई ज्ञानबाजी भगत यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवार दि. ४ ऑक्टोबर २०२३ रोजी संजयजी भगत यांच्या पंचशील निवासस्थानी द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आदरणीय भंतेजी प्राध्यापक खेम धम्मो सह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
या कार्यक्रमा प्रसंगी लोकमतचे तालुका प्रतिनिधी संजय भगत यांनी आई बनाबाई भगत यांच्या नेहमी सोबत असणाऱ्या प्रयागबाई सुरोशे, शांताबाई वाकोडे, पुष्पाबाई कावळे, सुशीला वाठोरे, यांचा सत्कार करून विशेष भेट दिली.
यावेळी प्रमोद उर्फ शाखा भरवाडे उपनगराध्यक्ष, गजानन साबळे बांधकाम सभापती, विनोद भगत संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती , विनोद कोपरकर संचालक बाबासाहेब सूतगिरणी पिंपळगाव, गजानन कांबळे माजी सभापती पंचायत समिती महागाव, गजानन धडवेकर, विलास मंदाडे सर, डॉ.योगेंद्र येवतीकर, डॉ. अमित झा, तुकाराम भिसे, शेख सादिक शेख इस्माईल, इरफान भाई, नीलूताई सोयाम, रावसाहेब पाटील ठाकरे, अरुण खंदारे, प्रकाशजी गायकवाड, डॉ. गायकवाड, विठ्ठलभाऊ वाघमारे, अमोल इंगोले, अखिल बाबुभाई, दिनेश चोतमल, बंग साहेब शेंबाळपिपरी, किसनराव वानखेडे, निलेश पाटील नरवाडे, शंकर बावणे, जगदीशभाऊ नरवाडे, शेषराव राजनकर, अमोल चिकणे सरपंच संघटना महागाव तालुका अध्यक्ष , या मान्यवरा सोबतच गणेश भोयर तालुका पत्रकार महासंघ अध्यक्ष, संजयभाऊ कोपरकर ,नरेंद्र नफते, धम्मानंद कावळे, गजाननभाऊ वाघमारे, पवन पाटील रावते, ओम देशमुख, रवी वाघमारे, माणिक मुनेश्वर, विश्वनाथ महामुने, उत्तमराव चिंचोळकर,विजय सूर्यवंशी , यांच्यासह तालुक्यातील राजकारणी मंडळी व अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
भन्तेजी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली कार्यक्रमाला मोठ्या संख्येत महिला पुरुष उपस्थित होते. यावेळी लोकचिंतन साप्ताहिकाचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गजानन वाघमारे यांचा वाढदिवस पत्रकार बांधवा तर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी सिद्धार्थ पेटारे, भैय्या पाईकराव, आदित्य भगत, सौ.सिंधुताई संजय भगत,विठ्ठलराव वाघमारे, यांनी अथक परिश्रम घेतले