विनापरवानगी गौणखनिज वापरल्यामुळे ले-आऊट धारकांस ६,६०,९६०/-रुपये दंड!
दंडाची रक्कम सात दिवसात भरा अन्यथा महसुल थकबाकी म्हणून वसूल करण्याचे आदेश!

पुसद : नगर परिषदेच्या हद्दीतील मौजा पुसद खंड-१ मधील शेत स.नं.१३ क्षेत्र २.०३ हे.आर या ले-आउट मध्ये विनापरवानगी गौणखनिज रस्त्यासाठी मुरूम व ढब्बर वापरल्यामुळे शेत जमीनमालक किरणकुमार बगडे व अमित कुमार बगडे रा. पुसद,यांना ६ लाख ६०हजार ९६०/-रुपये दंडाचा आदेश दि.२२ सप्टेंबर२०२५ रोजी तहसीलदार पुसद यांनी ठोठावला आहे.जरही दंडाची रक्कम ७ दिवसाच्या आत नभरल्यास महसुल थकबाकी म्हणून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
याबाबत झेप न्युजला महसूल प्रशासनाच्या सूत्राने दिलेली माहिती अशी की,पुसद नगरपरिषदेच्या हद्दीतील मौजा पुसद खंड -१ व उमरखेड रस्त्या लगत असलेली शेत सर्व्हे नं.१३ क्षेत्र २.०३ हे.आर किरणकुमार ध्रुवनारायण बगडे व अमितकुमार बगडे रा.पुसद यांच्या ले-आउटमध्ये सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कांबळे व इतर दोन दि, १७ डिसेंबर२०२४ रोजी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्याकडे ले-आउट मध्ये विनापरवानगी मुरूम , ढब्बर हे गौणखनिज रस्ता बनविण्यासाठी वापर केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी तक्रार दाखल केली होती.सदर तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार यांच्या पत्रानुसार दि.१७ डिसेंबर २०२४ रोजी मंडळ अधिकारी पुसद व तलाठी पुसद खंड-१ यांनी स्थळ पाहणी निरिक्षण करून यामध्ये मुरुम १५० ब्रास व ३० ब्रास दगड(ढब्बर) असा एकूण १८० ब्रास ले-आऊट मधील रस्त्यामध्ये वापरल्याचे स्थानिक पाहणी वरून दिसून येते असा संयुक्त अहवाल सादर करण्यात आला होता.
यावरून गैरअर्जदार तथा प्रतिवादी किरणकुमार बगडे व अमितकुमार बगडे रा.पुसद यांना तहसील कार्यालयाचे पत्र दि, २६ व२७ डिसेंबर२०२४ रोजी पाठवून हजर राहण्याबाबत सूचित करण्यात आले होते, यावरून प्रतिवादी यांनी दि.१जानेवारी२०२५ रोजी तहसीलदार यांना वाहतूक परवान्याच्या झेरॉक्सच्या प्रति सादर केल्या होत्या त्यावेळी दाखल केलेल्या परवानाच्या पावत्या व उपलब्ध कागदपत्राच्या आधारे हे प्रकरण गुणवत्तेनुसार आदेशाकरिता ठेवण्यात आले होते.तसेच तक्रारकर्ते यांचा तक्रार अर्ज प्राप्त प्रकरणातील अहवाल ले-आउट धारकांनी सादर केलेल्या पावत्या प्रकरणातील दाखल कागदपत्रे विचारात घेता ले-आउट धारकांनी दाखल केलेल्या ८५ पावत्याचे १७० ब्रास यापैकी ५१ पावत्या १०२ ब्रास ह्या ग्राह्य धरण्यात आल्या आणि उर्वरित ३४ पावत्या ६८ ब्रास ह्या गाह्य धरण्यात आल्या नाही.तहसीलदार यांनी आदेशात असे नमूद केले आहे की प्रतिवादी यांनी दाखल केलेल्या पावत्याची पडताळणी केली असता१जानेवारी२०२५ रोजी ८५ पावत्या एकूण १७० ब्रास त्यापैकी ५१ रॉयल्टी महाखनिज वरील तपासणी केलेल्या ईटीपी च्या पावत्या चे एकूण १०२ ब्रास गाह्य धरण्यात आले आहेत महाखनिज अँप वरील ईटीपी वरील पावतीवरील ठिकाणी टाकण्यात आल्याने त्या गृहीत धरण्यात आल्या उर्वरित वरील तक्त्यातील गाह्य न धरलेल्या एकूण ३४ पावत्या म्हणजे ६८ ब्रासच्या पावत्या ह्या ऑनलाइन ईटीपीनुसार नमूद केलेल्या ठिकाणी गौणखनिज न टाकता इतर वाहनद्वारे टाकलेल्या आहे व इतर व्यक्तीचे नावाने पावत्या असल्याने गृहीत धरण्यात येत नाहीत त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७)(८) नुसार तहसीलदार यांनी ले-आऊट धारक किरणकुमार बगडे व अमितकुमार बगडे रा.पुसद यांना तपावतीच्या एकूण ६८ ब्रास मुरूम,ढब्बर याचे स्वामित्वधनांची प्रतिब्रास बाजारभाव १६२०/- प्रमाणे एकूण रक्कम १,१०,१६०/-इतकी आणि बाजारभावाचे पाचपट दंड म्हणजेच ५,५०,८००/-असे एकूण होणारी दंडाची रक्कम ६,६०,९६०/- रुपये इतका ले-आउट धारक गैरअर्जदार यांच्याकडून वसूल करण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे सदर रकमेचा भरणा ७ दिवसात करण्यात यावा अन्यथा जमीन महसूल थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल असे आदेश पारित करण्यात आला आहे. त्यामुळे अवैधरित्या गौण खनिजाचा वापर करणाऱ्या ले-आऊट धारकाचे धाबे दणाणले आहेत.
उक्त वाहन/ई-टिपी हिस्ट्री व जीपीएस लोकेशन चेक केले असता महाखनिज अँप वरील नमूद एटीपी नुसार नमूद केलेल्या ठिकाणी (Destination) ला गेलेले नसल्याचे निदर्शनास आलेले असल्याने दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७)(८)नुसार मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून आदेश पारित केले आहे.-महादेव जोरवर, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी पुसद,