“योग” ही भारताने विश्वातील सर्व मानवास दिलेलीअमूल्य भेट-वसंत बी. कुळकर्णी जिल्हा न्यायाधिश पुसद

पुसद:यवतमाळ जिल्हा विधि सेवा समिती व तालुका विधी सेवा समिती पुसद तसेच पुसद वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१जुन२०२३ रोजी दुपारी २:१० वाजता पुसद न्यायमंदीर येथील कोर्ट कॅन्टीन हॉल येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” साजरा करण्यात आला होता. त्याप्रसंगी पुसद येथील जिल्हा न्यायाधिश वसंत बी. कुळकर्णी साहेब, हे अध्यक्ष म्हणुन उपस्थित होते. तसेच, श्रीमती एन. एच. मखरे मॅडम जिल्हा न्यायाधिश – २ पुसद, एस. एन. नाईक दिवाणी न्यायाधीश व. स्तर साहेब एन. जी. व्यास साहेब, सह दिवाणी न्यायाधिश क. स्तर, पुसद डी. जी. मस्के साहेब, २ रे सह दिवाणी न्यायाधिश क स्तर, व्ही. एस. वाघमोडे साहेब, ३ रे सह दिवाणी न्यायाधिश क स्तर, श्रीमती स्वाती जाधव मॅडम, ४ थे सह दिवाणी न्यायाधिश क स्तर, जी. एस. वरपे साहेब, ५वे सह दिवाणी न्यायाधिश क. स्तर, व्ही. बी. चव्हाण साहेब, ६ वे सह दिवाणी न्यायाधिश क. स्तर, कादरी साहेब, ७ वे सह दिवाणी न्यायाधिश क स्तर, तसेच पुसद वकिल संघाचे नवनियुक्त अध्यक्ष अॅड. शिवाजी खराटे, तसेच महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य, अॅड. आशिषजी देशमुख, अँड. खैरमोडे उपाध्यक्ष वकिल संघ पुसद हे मंचावर उपस्थित झाले होते.सदर कार्यक्रमाचे प्रथम मार्गदर्शक वक्ते म्हणुन सर्वप्रथम एन. जी. व्यास साहेब यांनी प्रत्येकाला शारीरीक व मानसीक स्वास्थ्य चांगले ठेवुन आत्मीक उन्नती करणे आवश्यक असल्याचे सांगितले आत्मीक उन्नतीमुळे जीवन सकारात्मक होत असेही म्हटले व निरनिराळे आसनांचे प्रात्यक्षिक स्वतः थोडक्यात करून दाखविले व योग हा सर्व मानव जाती साठीच आहे असे प्रतिपादन केले. त्यानंतर मा. डि.जी. मस्के साहेब, यांनी सूर्य नमस्काराचे महत्व सांगतांनी रोज सूर्यनमस्कार काढल्यास शारीरीक सौष्ठव प्राप्त होत असे म्हणुन ‘आदित्य नमस्काराः ये कुरवंती दिने दिने’ हा श्लोक म्हणुन दाखविला व तसेच योगाचे प्रकार व योग या शब्दाची उत्पती व योगगाने या बद्दलचचे महत्व समजावुन सांगितले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अध्यक्ष व्ही. बी. कुळकर्णी जिल्हा न्यायाधिश कं . १ साहेब, पुसद यांनी आपल्या भाषणांमध्ये सर्वप्रथम भरगच्च भरलेल्या हॉल मधील वकिल व पक्षकार यांना ‘आंतराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी दैनदिन जिवनात आहार व विहाराच्या सवयीं बदलल्यामुळे योगासन व प्राणयाम तसेच योग करणे गरजेचे झाले आहे असे म्हटले. योग ही जगाला भारताने दिलेली अमुल्य भेट आहे व यंदाची संकल्पना ‘वसुधैव कुटंबकम’ अशी आहे भारताची संस्कृती ही सर्व समावेशक सुरूवाती पासुनच आहे. ‘सर्वेपी सुखीना संतु सर्वेसंतू निरामया’ म्हणजेच सर्व जगातला मनुष्य हा सुखी व्हावा त्यास उत्तम आरोग्य मिळावे असे आपण सातत्याने म्हणत आलेलो आहोत. शरीर स्वास्थाचे महत्व फार आहे कारण शरीर चांगले राहिल्यास आपण आपले जिवनातील सर्व कर्तव्ये निट पार पाडू शकतो. योगा अभ्यासाचे अनेक प्रकार आहेत त्याचा अंगीकार करणे हे काळाची गरज आहे. २१ जुन २०१५ रोजी सर्वप्रथम जागतीक योग दिन सर्व विश्वात साजरा करण्यात आला. त्यांनंतर दरवर्षी निरनिराळ्या रूपरेषा आखून योग दिन योग दृष्टी योग साधना आपण सर्व करत आहोत योगामुळे खोल ध्यान करणे शक्य होते व त्यामुळे मन आणि शरीरावर संकटप्रसंगी नियंत्रण राहते व संकटात देखील मनुष्य हादरून जात नाही. योग हा भारताच्या ऋषी मुनींनी भारताला दिलेला अमुल्य वारसा व भेट आहे. सर्व जगानी आज योगाला स्विकारले आहे. योग म्हणणे व्यायाम नाही तो एक महत्वाचे शास्त्र आहे. योग करण्यासाठी घरातील मोठ्यांनी व लहान व्यक्तींनी प्रत्येक दिवशी थोडा वेळ काढणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आपली क्रियाशिलता वाढेल ज्यामुळे आपले संपुर्ण कर्तव्य व देश सेवा निट करू शकेल. योगाबदल लोकांमध्ये व समाजामध्ये जागृकता यावी यासाठी आपल्याला हा दिवस उत्साहाने साजरा करण्याची गरज आहे. ज्यामुळे योग ही भेट संपुर्ण मानवतेला भारताने दिलेली अमुल्य भेट आहे. आपण समजा योगा अभ्यास केल्यास हि भेट इतर भेटीपेक्षा किती तरी अमुल्य भेट असेल ती आज विश्वाने स्विकारेलेली आहे. असे मार्गदर्शन व्ही. बी. कुळकर्णी जिल्हा न्यायाधिश साहेब, पुसद यांनी केले. सदर कार्यक्रमांचे सुत्रसंचालन अॅड. अल्पना जैस्वार यांनी पार पाडले तर आभार प्रदर्शन प्रथितयश वकिल अॅड. सुचिता नरवाडे यांनी पार पाडले. सदरचे ‘आंतराष्ट्रीय योग दिवस’ या कार्यक्रमास मोफत सहाय विधीसेवा समिती मार्गदर्शन करणारे अॅड. महेशभाउ पाठक, सरकारी वकिल महेश निर्मल, काळेश्वरकर, रवी रूपुरकर, अँड. सुशिला नरवाडे, अॅड. मनोज घाडगे पाटिल, अॅड. अवधुत राजे अॅड. प्रशांत देशमुख, अॅड. गावंडे, अॅड. जाधव, अॅड. पवार, अॅड. राठोड, अॅड. श्रीमती आढाव, अॅड. श्वेता राजे, अॅड. निलिमा कांबळे, अॅड. अंबीका जाधव, अँड. अश्विनी पवार, अॅड. राजेश शिंदे, वकिल संघ पुसद हे मोठया संखेने, पक्षकार, महिला मोठया संख्येने सामिल झाले होते. तसेच न्यायालयीन कर्मचारी अधिक्षक विलास बंगाले, वरीष्ठ स्टेनो कफिल एजाज, वरीष्ठ लिपीक,आर. व्ही. पेटकर, सौ. माया काळबांडे, कनिष्ठ लिपीक जगदिश जाधव, सौ. अश्विनी बेले, सौ. ज्योती पवार, डोईजड, डाफ, काझी निलेश यावले निलेश खसाळे, प्रविण कोयरे चंद्रशेखर वानखेडे,आकाश भितकर स्वप्नील जोशी ज्ञानेश्वर वखरे, सौ. तेजस्वीनी खडसे, तसेच पोलीस कर्मचारी, प्रदिप जाधव, संतोष राठोड, नितिन तुमडाम हे उपस्थित होते.