गायमुख नगर ग्रामपंचायतीच्या ग्राम विकास अधिऱ्याकडून जातीव्देषातून संगणक परिचालकाचा मानसिक छळ!
संगणक परिचालकाने दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन!

पुसद :पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील दुसऱ्या नंबरची ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या महिला ग्रामविकास अधिऱ्याकडून संगणक परिचलकाचा जातीव्देषातुन मानसिक छळ करीत असल्याची तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पालकमंत्री यवतमाळ जिल्हा, जिल्हाधिकारी यवतमाळ,मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.यवतमाळ पुसद पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांकडे दाखल यांना दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या व तालुक्यातील दुसऱ्या नंबरची गायमुख नगर ग्रामपंचायती मधिल संगणक परिचालकाने ग्रामविकास अधिकारी जातीव्देषाने मानसिक छळ करीत असल्याची तक्रार दि.२४ नोव्हेंबर २०२३रोजी दाखल केली आहे . सदर तक्रारी मध्ये संगणक परिचालकांची सन१९ डिसेंबर २०१९ मध्ये सी.एस.सी. कंपनीने संगणक परिचालक या पदावर नियुक्ती केली असुन तेव्हापासून तक्रारकर्ता संगणक परिचालक गायमुख नगर ग्रामपंचायती कार्यालयांत कार्यरत असुन तेव्हापासून तो नियमितपणे ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाज सुरळीतपणे करीत आहे.व या कामकाजाची माहिती तालुका व्यवस्थापक आपले सरकार पंचायत समिती पुसद यांना देत आहे. या पाच वर्षाच्या कार्यकाळात या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जवळपास तीन ग्राम विकास अधिकाऱ्याने कामकाज पाहिले या तीनही अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली संगणक परिचलकाने व्यवस्थित रित्या काम केले कधी या ग्रामविकास अधिकाऱ्याने संगणक परिचालक याबद्दल कुठलीच तक्रार उपस्थित केली नाही परंतु या आर्थिक वर्षातील१ ऑगस्ट २०२३ रोजी या ग्रामपंचायत मध्ये एका ग्रामविकास अधिकाऱ्याची वर्णी लागली असताना त्या ग्रामविकास अधिकाऱ्याची ऑर्डर कॅन्सल करून वसील्याने नव्यानेच रुजू झालेल्या या ग्रामपंचायतीच्या महिला ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करून घेतलीी व या या ग्रामपंचायतीचा कारभार स्वीकारल्यापासून या ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकाला कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त वेळ बसून ठेवणे गरज नसताना सुट्टीच्या दिवशी कामावर बोलावून छळ करणे अनुसूचित जमातीचा असल्याने त्यांनी जाती द्वेषाने तिरस्कार करून वारंवार ग्रामपंचायत देखत घालून पाडून बोलून अपमान करीत असुन संगणक परिचालकाचा मानसिक छळ करीत अआहे ह्या ग्राम विकास अधिऱ्याना राजाश्रय असल्याने व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरद हस्त असल्याने तक्रारकर्ता संगणक परिचालकाला कामावरून काढून टाकण्याची धमकी वांरवार देत असल्याची तक्रार ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री विरोधी पक्षनेते पालकमंत्री यवतमाळ जिल्हा महा व्यवस्थापक सीएससी कंपनी महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ व तालुका व्यवस्थापक आपले सरकार पंचायत समिती पुसद तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती पुसद यांना लेखी तक्रार देऊन सदर तक्रारीची सत्यता पडताळून ग्राम विकास अधिकारी यांची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामविकास अधिकारी याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.



