वनविभागाचे अधिकारी कर्मचारी करीत आहेत शासनाच्या निधीची खुली लूट; एकाच दिवशी वेगळ्या वेगळ्या कामावर एकच मजूर दाखवून शासनाच्या निधीचा केला अपहार!
कुंपणच खात आहे शेत!!

पुसद: वनविभागातील वनपरिक्षेत्राच्या पडीत जमीनीवर कुरण विकास अंतर्गत रोपवनात विविध कामे करण्यात आली. या कामांत बोगस मजूर दाखवून शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा अपहार करण्यात आल्याची बाब माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीवरून उघड झाली आहे. काही ठिकाणी तर एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी एकच मजूर कामे करीत असल्याचे दाखवण्यात आले असून काही ठिकाणी तर कामे न करता सुद्धा बिले काढण्यात आली. त्यामुळे वनअधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून संबंधित वनअधिकारी व वनरक्षकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पुसद तालुक्यातील वन विभागाच्या काही बीट कक्ष क्रमांक ३५६मध्ये सन २०२२ ते२०२३ या आर्थिक वर्षात १० हेक्टर पडीत जमिनीवर कुरण विकास अंतर्गत वनविभागाच्या वतीने गवत काढणे झाडाच्या फांद्या छाटणे, झाडोरा कमी करणे आदी कामे मजुराच्या हाताने दि.१संप्टेबर २०२२ते ३१डीसेबर २०२२ या कालावधीत करण्यात आली.व त्यांच्या नांवे एकुण ६०दिवसाच्या मंजूरीचे २४ हजार ८२१ रुपये व्हाउचर तयार करून मजूरी काढली. मात्र याच कालावधीत दुसऱ्या बाजूला या मजूराला दुसऱ्या ठिकाणच्या वर्तुळातील बिटमध्ये २ नोव्हेंबर २०२२ ते १९ नोव्हेंबर २०२२या तारखेच्या कालावधीत साफसफाई करणे, सीमांकन करणे, ग्रीड टाकून उपचार नकाशा तयार करणे, अदि कामे केल्याचे दाखवून१८ दिवसाचे बोगस व्हाउचर तयार करून बिले काढण्यात आले. यामध्ये एकाच मजुराला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दाखवून रुपयांचा अपहार करण्यात आला असून, असे कित्येक मजुरांची बोगस नावे मस्टरवर आणखी असू शकतात केवळ कागदोपत्री व्हाऊचर तयार करून व बोगस मजूर दाखवून शासनाच्या निधीचा गैरव्यवहार करण्यात आला. यामध्ये वनविभागाच्या कोणत्या अधिकाऱ्याची वनरक्षकाची भूमिका मुख्य आहे.वनविभागाच्या कोणत्या बड्या अधिकार्याच्या आशिवार्दामुळे वन विभागाचत चालले तरी काय.? कुंपणच खात आहे शेत.. तरीही संबंधित प्रशासन अधिकारी गप्प कां..? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.त्यामुळे या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली असून शासनाच्या निधीचा अफार केल्यामुळे दोषीवर कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा दिला आहे.



