अपघात!ट्रकचा महामंडळाच्या एसटी बसला कट, चालकाच्या सावधगिरीने प्रवासी थोडक्यात बचावले!
नशीब बलवत्तर म्हणून मोठी जीवित हानी टळली!

पुसद : विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने महामंडळाच्या एसटीला कट मारल्याने बसचालकाचा ताबा सुटला व एसटी बस रस्त्याखाली उतरली पण बसवर चालकाला पुन्हा वेळेवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने थोडक्यात निभावले नशीब बलवत्तर म्हणून ३५ ते ४०प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला व मोठी जीवितहानी टळली.ही दुर्घटना आज वाशिम – पुसद -मार्गावर खंडाळ्याच्या जंगलातील आडगाव फाट्याजवळ मंगळवारी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जंगलात पुसद-वाशिम मार्गावर आडगाव फाट्याजवळ महामंडळाची एसटी बस क्रमांक (एमएच ४० एक्यु ६२५१) शेगांव वरून वाशिम-पुसद मार्गे उमरखेड येथे जाणार होती. तर अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक एमएच २९ बीई ३९४९ हे विरुद्ध दिशेने वाशिम कडे जात होता. अचानक एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने बसला जोरदार कट मारल्याने बसचालकाचा एसटी बसवरील ताबा सुटला व अपघात टाळण्यासाठी बस रस्त्याच्या खाली उतरली पण बसचालकाने पुन्हा वेळेवर बसवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने थोडक्यात निभावले नशीब बलवत्तर म्हणून ३५ ते ४०प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला आणि मोठी जीवितहानी टळली. परंतु या अपघातामध्ये महामंडळाच्या एसटी बसच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अशोक लेलँड ट्रक सुद्धा पलटी होऊन त्या ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर अपघात एवढा भीषण होता की अपघाताच्या ठिकाणापासून सुमारे ५० फूट दूर एसटी बस गेली असती तर मोठी हानी झाली असती एसटी महामंडळाच्या बस चालकांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवित हानी टळली आहे. खंडाळा पोलिसात ट्रक चालका विरोधात बस वाहक व चालकांकडून तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.