ईतर

शेतकऱ्यांनी आपल्या न्याय , हक्क , अधिकारासाठी संघटित व्हावं -नेते मनीष भाऊ जाधव

पुसद:सततची नापिकी , कर्जबाजारीपणा , घटलेलं उत्पादन , लावगडीवरील वाढता खर्च , नैसर्गिक आपत्तीत कधी ओला तर , कधी कोरडा दुष्काळामध्ये शेतकरी आर्थिक विवेचनेत हतबल व हताश असून मात्र राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात मशगुल आहेत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून केंद्र आणि राज्य शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे शासनाच्या व प्रशासनाच्या अनास्थेला शेतकरी विरोधी धोरणाला शेतकरी बळी पडला आहे स्वातंत्र्य उत्तर कालखंडात शेतकऱ्यांची मोठी उपेक्षा झाली आहे त्यामुळे आताशेतकऱ्यांनी सत्ताधारी शासनासोबत आपल्या न्याय हक्क अधिकारासाठी संघर्षाची भूमिका ठेवून संघटित होऊन लढा द्यावा असं आवाहान शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष यांनी पुसद स्वाभिमानी शेतकरी संघटना च्या कार्यकारणी बैठकीत उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन संबोधनामध्ये केले आवाहन केलेे.

आज पुसद येथील विश्रामगृहावरस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुसद तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली या कार्यकारणीच्या बैठकीला मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शेतकरी नेते अविनाश भाऊ पोळकट यांची उपस्थिती लाभली होती या कार्यकारणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांच्या सर्व संमतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुसद तालुका अध्यक्ष म्हणून प्रेमराव रामराव सरगर तर म्हणून विनोद भाऊ केवडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला जेष्ठ शेतकरी नेते अविनाश भाऊ पोळकट यांचं शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी सत्कार केला आज झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्यावर चर्चा करण्यात आली व आगामी काळात शेतकऱ्यांना संघटित करून लढा देण्याबाबत व संघटनेची विविध कार्यपद्धतीबाबत ज्येष्ठ शेतकरी नेते अविनाश भाऊ पोळकट यांनी विस्तृत मार्गदर्शन केले शेतकऱ्यांच्य या कार्यकारणी बैठकीला प्रेम राव सरगर गाजीपुर , विनोद केवढे , पुसद धीरज भाऊ पांडे पुसद , अमोल झरकर , यु के राठोड , प्रमोद दीक्षित , केशव भाऊ खंदारे ,निलेश भाऊ सरगर , अशोक भाऊ चव्हाण , ज्ञानेश्वर भाऊ राठोड , भैय्या गाडेकर , गोलू चव्हाण ,देविदास झरकर ,आयुब खान पठाण , सिकंदर खान पठाण मराठी दिलीप भाऊ बोरकडे अशोक गुलाब राठोड या कार्यकारणीच्या बैठकीला पुसद तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे धीरज भाऊ यांनी केले तर कार्यक्रमाचे समारोप आयुब भाई पठाण यांनी केले अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पुसद तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकारणी बैठक संपन्न झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close