अज्ञात रोगाने नुकसानग्रस्त सोयाबीनचे पंचनामे करुन मदत द्या-शेतकर्यांची उपविभागीय अधिकार्यांना निवेदनाव्दारे मागणी!

पुसद: अज्ञात रोगाने नुकसानग्रस्त सोयाबीनचे पंचनामे करुन शेतकर्यांना विम्याचा लाभ द्यावा अशी मागणी वालतूर रेल्वे व भोजला शिवारातील आपत्तीग्रस्त शेतकर्यांनी उपविभागीय अधिकार्यांना सोमवारी (ता.१८) दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शेतकर्यांनी बहुतांश क्षेत्रात सोयाबीन पीक घेतले असून सोयाबीन या पिकाला अज्ञात रोगाची लागण झाली असून शेंगा भरण्यापूर्वीच संपूर्ण सोयाबीन पिवळे पडून पीक उध्वस्त होत आहे. शेतकऱ्यांच्या शेताचा कृषी विभाग व महसूल विभागामार्फत पंचनामा करण्यात यावा व विमा कंपनीकडून मदत देण्यात यावी. तसेच जिल्हास्तरावरील शास्त्रज्ञ बोलावून त्यावर काही उपाययोजना करता येईल का? यासाठी मार्गदर्शन करण्यात यावे तसेच आम्हाला शासनाकडून, विमा कंपणीकडून मदत मिळण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठवावा. याकरता लवकरात लवकर नियोजन करून काही उपाययोजना करता येईल का? याचे मार्गदर्शन करण्यात यावे. अशी मागणी आपत्तीग्रस्त शेतकर्यांनी उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.
यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. तेव्हा लवकर जर नियोजन केले नाही तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या होण्याची शक्यता आहे. याची गंभीर दखल घ्यावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा असेही निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर सूर्यकांत जामगडे,श्रीधर गरड,विशाल गायकवाड,सचिन ठाकरे,सुशांत पाटील,वैभव पाटील,भगवान धुळे,किशोर जामगडे,रमेश जामगडे,मनोहर जामगडे,गजानन जामगडे,अनिलसिंह बयास,बाबाराव देशमुख,अनिरुद्ध जामगडे,रवींद्र गायकवाड,जनक जामगडे,विजय गायकवाड,विद्याधर गरड,रंगराव जामगडे,दिपक जामगडे,राजू जामगडे,भगवान जामगडे,दत्तराव जामगडे आदी शेतकर्यांनी केली आहे.



