ईतर

शेतकऱ्यांच्या आत्महत्येला केंद्र आणि राज्य शासनाचे कृषी विरोधी धोरण जबाबदार-शेतकरी नेते मनीष जाधव!

महागाव:तालुक्यातील व पुसद विधानसभा मतदारसंघातील अतिशय दुर्गम व डोंगरी भागात वसलेल्या वाकान या गावात दोन दिवसापूर्वी आकाश बापूराव कुरकुटे या युवक शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली या शेतकरी आत्महत्याग्रस्त पीडित कुटुंबाची आज शेतकरी नेते मनीष जाधव यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच सांत्वन करून आस्थेने विचारपूस केली आत्महत्या केलेल्या मृतक युवक शेतकरी आकाशच्या पश्चात पत्नी व त्याला दोन मुली व आई व चार भावंड आहे आकाश सतत आपल्या आईकडे खाजगी घेतलेल्या कर्जाबाबत तो नेहमी चिंता व्यक्त करत होता पावसाने दिलेल्या खंडामुळे शेतातील उभं पीक करपून गेली लागवडीसाठी उभं केलेलं कर्ज कस फेडायचे या विवेचनेत तो होता या संदर्भात आपल्या आईकडे सातत्याने बोलून दाखवत होता आकाश हा अत्यंत मनमिळाऊ व सौजन्यशील इतरांच्या मदतीला धावून जाणारा सामाजिक कार्यात पुढाकार घेणारा युवक असं टोकाचे निर्णय घेऊन जीवन संपविल्याने संपूर्ण गावामध्ये त्याच्या मृत्यूने शोक कळा पसरलेली आहे महागाव तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वी घोणसरा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी गांजाची शेती केल्याच प्रकार उघड झाले जगाचा पोशिंदा म्हणून धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर गांजा लावण्याची वेळ आली कुणामुळे.? व का.? याचा आत्मपरीक्षण कृषी धोरण ठरविणाऱ्या केंद्रात बसलेल्या सत्ताधारी शासनाने करावा आज शेतकऱ्याचे सोयाबीन बाजारात ३८०० पासून ४२०० पर्यंतचा दर त्याला मिळत आहे ज्यामध्ये लागवड खर्च सुद्धा काढण कठीण आहे शेतकऱ्यांनी जगावं कसं असा यक्ष प्रश्न आहे गेल्या नऊ महिन्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात २०१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे शासन म्हणून असलेली ही व्यवस्था अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार सततची नापिकी , कर्जबाजारीपणा , नैसर्गिक आपत्ती , पडणारे दुष्काळ वन्यजीवाचा त्रास मिळत नसलेली वीज वेळेवर न मिळणारी शासनाची आर्थिक मदत असे एक नव्हे तर अनेक आसमानी व सुलतानी संकटाच्या मालिकेखाली शेतकरी आज प्रचंड मानसिक तणावाखाली असून यामधून येत असलेल्या नैराश्यातून स्वतःचे जीवन संपत आहे याच शासनाने गांभीर्याने विचार करायला हवा असं घनाघाती आरोप यावेळी मनीष जाधव यांनी राज्य शासनावर केले शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचे पाऊल उचलू नये आत्महत्या हा कुठल्याही प्रश्नाला उत्तर होऊ शकत नाही असे भावनिक आव्हान त्यांनी यावेळी केले यावेळी त्यांच्यासोबत अश्वजीत भगत सरपंच वाकान अविनाश राठोड विशाल पवार स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा सचिव निशिकांत राऊत रवी राठोड व गावातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

सोयाबीन व कापसाचे दर प्रचंड दबावात आलेले असताना सत्ताधारी आमदाराकडून याबाबत राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणासाठी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरताना दिसत नाही शेतकरी हा केवळ मताच्या जोगव्यासाठीच आठवतो का हे अत्यंत दुर्दैवी बाब असून पुसद विधानसभा हा वसंतराव नाईक साहेबांचा मतदारसंघ असून याच मतदारसंघातून हरितक्रांतीची मुहूर्त पेड रोहल्या गेली व शेतकरी कारखानदार व्हावा अशी अभिलाषा नाईक साहेबांनी बाळगली आणि त्याच मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे हे स्थानिक नेत्याला आत्मचिंतन करायला लावणारा विषय आहे आकाश ची आत्महत्या ही आर्थिक विवेचनेतून झाली असून या पिढीत कुटुंबाला स्थानिक लोकनियुक्त आमदार इंद्रनील नाईक यांनी एक महिन्याचा वेतन द्यावं अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून स्थानिक आमदाराला करतो- शेतकरी नेते मनीषभाऊ जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close