पुसद येथील ईटावावार्डात बंजारा तीज महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा..

पुसद: शहरातील इटावावार्डतील येरावार ले-आउट स्नेहनगर गडदे नगर मैनाबाई नगर रेवती ले-आउट येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी माता जगदंबा च्या कृपेने, संत सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने दरवर्षी तीज उत्सवाचे आयोजन केले जाते, यावर्षी ही इटावावार्डतील या भागात तीज महोत्सव आयोजित करण्यात आला होता. बंजारा समाजाच्या वतीने हा तिज महोत्सव अकरा दिवसांचा आयोजित करण्यात येतो.पुसद येथील ईटावावार्डात बंजारा तीज महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला..
या अकरा दिवसांमध्ये वार्डा-वार्डातील सर्व महिला व पुरुषांनी या माता जगदंबा ची तीजेची पूजा-अर्चना केली जाते. अखेरच्या दिवशी तीच महोत्सवाचा विसर्जन करण्यात आले.त्यावेळेस बंजारा समाजातील संस्कृती प्रमाणे वेशभूषा परिधान करून महिला पुरुष मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते .कधीकाळी डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजात तीज म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. श्रावण महिन्यात ठिकठिकाणी बंजारा तांड्यांवर तिज उत्सवाची चाहूल पाहायला मिळतो. सध्या तीज उत्सवाच्या बंजारा लोकगीतांनी तिथल्या लोकांवर चांगलच गारुड घातलं आहे. पारंपारिक वेशभूषेत फेर धरून नाचणाऱ्या महिला मुली सहभागी झाल्या होत्या.
डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजाने आपली वेगळी परंपरा,लोकसंस्कृती आणि वेगळेपण जपल्याचे यानिमित्ताने दिसून आले. या वेळी नायक हाजूसिंग चव्हाण , कारभारी मेश्राम,विजय भाऊ मेरसिंग राठोड, पंडित नंदू राठोड, महेश सुभाष चव्हाण, सुरेश राठोड, बिबिचंद रुणवाल, प्रकाश पवार, रामधन राठोड, प्रल्हाद चव्हाण, आत्माराम जाधव, गोकुळ राठोड, विनोद राठोड, प्रकाश पवार पी. एम चव्हाण व समस्त बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



