ईतर

पुसद तालुक्यात तिन नवीन ग्रामपंचायतीची स्थापना ; ना. इंद्रनील नाईक यांच्या पाठपुराव्याला अखेर यश!

पुसद तालुक्यात आता एकूण १२३ ग्रामपंचायती

पुसद : तालुक्यातील पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात संत सेवालाल महाराज बंजारा,लमाण तांडा समृद्ध योजना अंतर्गत लोहारा ई, पारवा बु. आणि मोहा ई. या गटग्रामपंचायतींचे विभाजन करून तीन नवीन ग्रामपंचायतीची स्थापन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. ग्रामविकास राज्यमंत्री तथा आमदार इंद्रनील नाईक यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.या नवीन ग्रामपंचायतींच्या स्थापनेला ग्रामविकास व पंचायतराज विभागाने मंजुरी दिली आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २४३ (खंड छ) आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ४ नुसार या नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश राजपत्रात प्रकाशित करण्यात आला आहे. या नव्या ग्रामपंचायतींमुळे या सर्व गावांच्या विकासाला आता गती येऊ शकेल, तसेच या निर्णयानुसार तालुक्यातील लोहारा ई ग्रामपंचायतीचे विभाजन होणार आहे. तर लोहारा खुर्द नावाची नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली आहे.पारवा बु. ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन पारवा खुर्द ही स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तर मोहा ई. ग्रामपंचायतीचे विभाजन करून मोहा ई, नंदपूर, रामनगर आणि शिवानगर या गावांचा समावेश असलेली नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आली आहे. या निर्णयांमुळे स्थानिक प्रशासन अधिक सक्षम होईल, ग्रामीण विकासाला वेग मिळेल तसेच तांडा व ग्रामीण वस्तीतील जनतेच्या मूलभूत गरजांवर थेट लक्ष केंद्रित करणे शक्य होणार आहे. स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत असून, विकासाच्या नव्या पर्वाला सुरवात झाल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.

 

पुसद तालुक्यात आता एकूण १२३ ग्रामपंचायती.. 

पुसद तालुक्यात पुर्वी एकूण १२० ग्रामपंचायती होत्या. त्यात आणखी तिन नवीन ग्रामपंचायतींची भर पडल्यामुळे ही संख्या १२३ झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close