ईतर

तंबाखू व्यसनाचे निर्मूलन करुन युवकांनी शक्तिमान होणे काळाची गरज : व्ही.बी. कुळकर्णी

पुसद :यवतमाळ जिल्हा विधी प्राधिकरण व तालुका विधी सेवा समिती, पुसद तसेच पुसद वकिल संघ यांच्या संयुक्त विदयमाने कायदेविषयक ज्ञानदान शिबीर हा कार्यक्रम दि. ३१ मे २०२४ रोजी दुपारी २.१० वाजता पुसद न्यायमंदीर येथील कोर्ट कॅन्टींग हॉलमध्ये आयोजीत केला होता. सदर कार्यक्रमाचा विषय हा तंबाखुचे निर्मूलन व तंबाखु विरोधी दिवस होता.सदर कार्यक्रमामध्ये एन.बी. जाधव साहेब, २ रे सहदिवाणी न्यायाधिश व. स्तर, पुसद, श्रीमती स्वाती जाधव मॅडम, ३ रे सहदिवाणी न्यायाधिश क. स्तर, पुसद, गोविंद एस. वर्षे साहेब, ४थे सहदिवाणी न्यायाधिश क. स्तर, पुसद, झेड. झेड. कादरी, ६वे सहदिवाणी न्यायाधिश क. स्तर, पुसद उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम एन. बी. जाधव यांनी तंबाखु विरोधी दिवस या विषयांवर आपले विचार मांडले. त्यांनी तंबाखु हा शरिराला अत्यंत घातक असल्याचे सांगितले. तंबाखुमुळे शरिरावर विपरीत परिणाम होवुन मानसिक आरोग्य बिघडते असे संबोधीत केले. त्यानंतर सदरच्या विषयावर गोविंद एस. वर्षे यांनी आपले विचार मांडतांनी जागतिक पातळीवर तंबाखुजन्य पदार्थाचा अतिशय विरोध होत असल्याचे प्रतिपादन केले व माणसाच्या जिवनामध्ये सर्वात जास्त महत्वाची बाब म्हणजे त्यांची शारिरीक संपत्ती आहे. व्यसनामूळे शरिर दुर्बल होत असते व्यसन हे माणसाचे शत्रू आहे. तसेच व्यसानामुळे आर्थीक दृष्टीने माणुस कमकुवत होतो व व्यसनाकरीता माणुस काहिही करु शकतो व तंबाखुमुळे व तंबाखुजन्य पदार्थामुळे शरिराला अपाय होत असतो. त्यानंतर या विषयावरचे तिसरे वक्ते श्रीमती स्वाती जाधव, ३रे सहदिवाणी न्यायाधिश क. स्तर यांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन केल्यास कॅन्सर सारखे रोग होतात. एखादे रोग होण्यापेक्षा तो रोग होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे. असे प्रतिपादन केले.सदर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष व्ही. बी. कुळकर्णी यांनी अध्यक्षीय विचार मांडतांनी अंमली पदार्थाचे सेवन केल्यास कशा प्रकारचे दुष्परिणाम शरिरावर होतात हे सांगितले. पालकांनी आपल्या पाल्यांना आदर्श व संस्कार देण्याची काळाची गरज असल्याचे सांगितले. पुढे त्यांनी असेही सांगितले की, किशोर वयात मुले आई- वडीलांचा व जेष्ठ व्यक्तींचा नेहमी आदर्श घेत असल्याने त्यांनी व्यसनापासुन दुर रहावे व व्यसने टाळावे. वडील किंवा आई, मोठे भाउ तंबाखु व सिगारेटचे व दारुचे व्यसन करत असल्यास घरातील लहान मुले देखील त्यांचे अनुकरण करुन पुढे व्यसनाधीन होउ शकतात. तंबाखुजन्य व दारु पदार्थीचे व्यसन हे अत्यंत गंभीर असुन ते स्वतःच्या शारिरीक नुकसान व आर्थीक नुकसानीला जबाबदार ठरते. तंबाखुजन्य पदार्थाचे व्यसन लागल्यास व पैसा नसल्यास तो व्यक्ती घरातील भांडेकुडे विकुन व्यसनाची भूक भागवितांनाचे चित्र दिसते. अंमली पदार्थ व तंबाखुजन्य पदार्थ यांचे दुष्परिणाम काय आहेत व ते कसे टाळले जातील या संबंधातुन बालक युवक तसेच महिलांमध्ये जनजागृती करणे काळाची गरज आहे अनेक घरे व परिवार अशा व्यसनामुळे आर्थीक दृष्टीने उध्वस्त झाल्याचे दृश्य बऱ्याच ठिकाणी दिसुन पडते.भगवंताने मानवी शरिर कोणत्याही नशेला स्विकार करण्यासाठी तयार केलेले नाही. ते स्वादीष्ठ व रुचकर व सकस अन्न ग्रहण करण्यसाठी तयार केलेले आहे. तसेच ज्या अन्नापासुन शरिर निकोप राहते ते अन्न ग्रहन करण्यासाठी तयार केलेले आहे. तंबाखुजन्य पदार्थ सेवन केल्यास कॅन्सर सारख्या महाभयंकर आजाराला आपण निमंत्रण देवु शकतो. त्यामुळे व्यसनमुक्तीची नितांत गरज आहे तसेच शरीर स्वास्थ चांगले ठेवण्याची गरज आहे. तंबाखुच्या पुडीवर तंबांखु किती घातक आहे याचा इशारा असतो, युवकांनी त्या इशा-याला लक्षात घेवुन व्यसनाधिनता टाळली पाहीजे. तंबाखुच्या व्यसनामुळे कॅन्सर झाल्यास त्याच्या वेदना फार असतात व व्यक्ती मृत्युंची भिक मागतो हे दिसुन पडते. त्यामुळे तरुनांनी व्यसनाधिनता सोडून मजबुत स्नायुंचे शरिर बनविले पाहीजे. सशक्त व पोलादी शरिरच चांगली बुध्दी प्राप्त करुन देते व त्यांची देशाच्या कामात मदत होते असे मार्गदर्शन त्यांनी केले.सदरच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हे अॅड. श्वेता पांढरीपांडे यांनी केले तर आभारप्रदर्शन अॅड. सविता आढाव यांनी सुनियोजीत पदधतीने केले. सदरच्या कार्यक्रमाला अनेक वकील मंडळी हजर होते त्यामध्ये विशेषत्वाने अॅड. गावंडे, अॅड. सुशिला नरवाडे, अॅड. ममता सगणे, अॅड. दिवेकर, अॅड. जयश्री देशमुख, अॅड. डी.डी. पवार, अॅड. जाधव, अॅड. ठाकरे व सर्व न्यायाधिश मंडळी हजर होते. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर विधीसेवा समिती व वकीलसंघ यांच्याकडुन मा. कुळकर्णी साहेब यांची यवतमाळ येथे बदली झाल्याने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन त्यांचा निरोप समारंभ करण्यात आला व अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close