ईतरक्राइम

दुचाकीसह चोरटा पोलिसांच्या जाळ्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई!

पुसद :शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत असल्याने तसेच अ उघड गुन्हे उघडकीस आणुन आरोपीचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आदेश दिले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका अट्टल चोरट्यास दुचाकीसहअटक केली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी झेप न्यूज ला दिलेली माहिती अशी की,यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध्य धंदे, अवैध्य शस्त्र (अग्नीशस्त्र) बाळगणा-या तसेच अ उघड गुन्हे, आरोपी शोध तसेच मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से.) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुशंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधिनस्थ पथकांना मोटारा सायकल चोरीचे अ उघड गुन्हे उघड करून आरोपी शोध घेणे बाबत सुचना दिल्याने दि२२में२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद पथक हे सरकारी वाहनांने पुसद उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना फिर्यादी नामे प्रवीण कळणुजी मात्रे वय.३५, रा. डोंगरगाव ता.महागाव जि. यवतमाळ यांची दुपारी १३.३० वा. पुसद शहर पोलीस स्टेशन ह‌द्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून डिसकव्हर मो.सा.नंबर एम.एच.२९ओओ.०४२० ही चोरी गेल्याची माहीती समजल्याने त्याप्रमाणे सदर पथकांने तात्काळ घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करून तसेच इतर माहीतीद्वारे आरोपी व चोरीस गेले मो.सा.चो शोध घेत असतांना सदरचा संशयित सी.सी. टी.व्ही. फुटेज मध्ये दिसणारा आरोपी हा पिंपळगाव सुतगिरणी येथे काम करणारा प्रदिप सुदामराव देबगुंडे वय ४०. सध्या रा. पिंपळगाव सुतगितरणी मुळ रा.सोईट ता.उमरखेड जि. यवतमाळ हा आसल्याची खात्रीशिर माहीती प्राप्त झाल्याने त्याप्रमाणे सापळा कारवाई करून त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे पोलीस कौशल्याचा वापर करून विचारपूस करता त्याने दि,२३में२०२५ रोजी दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून डिसकव्हर मो.सा. नंबर एम.एच. २९ ओओ ०४२० ही चोरी केल्याची कबुली दिली तसेच त्याचेकडे मिळून आलेली दुसरी मो.सा. विना नंबरची लाल कलरची हिरोहोंडा स्प्लेंडर मो.सा. तिचा इंजिन नंबर व चेसीस नंबरची माहीती घेतली असता सदर मो.सा.चोरीचा पोलीस स्टेशन हदगाव येथे गुन्हा दाखल असल्याची माहीती प्राप्त झाल्याने अशा प्रकारे पुसद शहर पोलीस स्टेशन अप.क.३०३/२०२५ कलम ३०३ (२) भा. न्या. संहीता व हदगाव पोलीस स्टेशन अप.क. ११८/२०२५ कलम ३७९ भा.द.वि. मधील वरील वर्णनाच्या चोरीच्या दोंन्ही मो.सा.एकूण किं.रू४०,०००/- च्या जागेवरच पंचनाम्याने जप्त करून ताब्यात घेवून आरोपी प्रदिप सुदामराव देबगुंडे वय ४०, सध्या रा. पिंपळगाव सुतगितरणी मुळ रा.सोईट ता.उमरखेड जि. यवतमाळ व दोंन्ही जप्त मो.सा. पुढील कारवाई साठी पुसद सिटी पोलीस स्टेशनचे ताब्यात देवून उत्कृष्ट कामगिरी करण्यात आली आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता सा.अप्पर पोलीस अधिक्षक यवतमाळ पियुष जगताप सहा.पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बी.जे.,पोलीस निरीक्षक सतिश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पो.हवा/संतोष भोरगे, पो. हवा/तेजाब रणखांब, पो.हवा / रमेश राठोड, पो.हवा / कुणाल मुंडोकार, पो.कॉ/ सुनिल पंडागळे, चापोउपनि / रविद्र शिरामे, चापोकों / राजेश जाधव सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close