नायलॉन मांजा अखेर पोलिसांच्याच गळ्यावर; मित्रामुळे बालबाल बचावले

पुसद: येथील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी कर्तव्यावरून आपल्या मित्रासह दुचाकीने घरी परत असताना लक्ष्मी नगर येथील बुद्ध विहाराजवळ अचानक नायलॉन मांजा पोलीस कर्मचाऱ्यांच्या गळ्याला भिडला असता तेवढ्यात त्यांच्या मित्राने हा मांजा हातात पकडून वर काढल्याने हे पोलीस कर्मचारी बालबाल बचावले आहे. परंतु मांजा त्यांच्या गळ्यामध्ये अक्षरशः रुतल्याने त्यांचा थोडा गळा चिरला आहे. सुदैवाने या घटनेत मित्राने तत्परता दाखवल्याने दुचाकीस्वार कर्मचारी थोडक्यात बचावला आहे .अक्षय आनंदराव मोठे वय अं.३५ वर्षे रा.पुसद असे पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद येथील लक्ष्मी नगरमध्ये काळजाचा ठोका चुकविणारी घटना घडली आहे. पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले अक्षय आनंदराव मोठे हे कर्तव्यावरून आपल्या दुचाकीने मित्रासह घरी परत जात असताना अचानक लक्ष्मी नगर येथील बुद्ध विहारा जवळ त्यांच्या गळ्यामध्ये नायलॉन मांजा अक्षरशः रुतल्याचे त्यांच मित्र टायगर ग्रुप पुसद चे अध्यक्ष विष्णू गुद्दटवार यांना लक्षात येताच त्यांनी हा माझा वर काढून पोलीस कर्मचारी मित्राचा जीव वाचवला परंतु मांजा त्यांच्या गळ्यामध्ये अक्षरशः रुतल्याने त्यांचा थोडा गळा चिरला आहे. सुदैवाने या घटनेत मित्राने तत्परता दाखवल्याने दुचाकीस्वार कर्मचारी थोडक्यात बचावला आहे . सुदैवाने त्यांची प्रकृती चांगली आहे.गेल्या काही दिवसांपासून नायलॉन मांज्यानं अनेकांना दुखापत झाल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे आता बाईकस्वारही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक उपाय योजत आहेत. कारण मागील चार-पाच दिवसांमध्ये नायलॉन मांजा गळ्यात अडकून राज्यभरात अनेक जण गंभीर जखमी झालेत. पुसद शहरातील तरुणांमध्येही मकरसंक्रांतीचा उत्साह ओसंडून वाहत असला तरी वाहनचालकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. त्यामुळे खरं तर मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात नायलॉन मांजा विक्रेत्यांनी बेसुमार मांजा विकल्याने पतंगबाजीला उधाण आलं असून, रविवारपर्यंत उत्साह असाच कायम राहणार असल्यामुळे नागरिकांनी सतर्कता सावधानता म्हणून रस्त्यावरून जाताना किंवा वाहन चालविताना गळ्यात दुपट्टा किंवा रुमाल बांधूनच प्रवास करावा असे जाणकाराचे मत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने अशा बीजाबातदारपणे नायलॉन मांजा वापरण्यावर करडी नजर ठेवून कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागले.