ईतर
डॉ. राजिक अहेमद यांची पोलीस मित्र गुन्हे नियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, महाराष्ट्र राज्य, यवतमाळ जिल्हा.. वरिष्ठ कार्यकारीपदी निवड!

पुसद : येथील रहिवासी असलेले डॉ. राजिक अहेमद यांची यवतमाळ जिल्हा पोलीस मित्र गुन्हे मध्यवर्ती आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वरिष्ठ कार्यकारी पदावर नियुक्तीच निवड करण्यात आली आहे . महाराष्ट्र पोलीस मित्र राज्य अध्यक्ष राजहंस वाढे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. राजिक अहेमद यांची पोलीस मित्र गुन्हे मध्यवर्ती संघटनेच्या यवतमाळ जिल्ह्याच्या वरिष्ठ कार्यकारी पदावर निवड झाली. डॉ. राजिक अहेमद हे अल रझा बहुउद्देशीय संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी सामाजिक कार्य आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलीआहे. त्यामुळे त्यांच्या या निवडीने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.