ईतर

काळी (दौ.) प्राथमिक आरोग्य केंद्रावरील अशा गटप्रवर्तक पद भरतीत गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप!

काळी (दौ.) प्रतिनिधी ( संदीप ढगे) महागांव तालुका पंचायत समिती अंतर्गत काळी (दौ.) प्राथमिक आरोग्य केंद्रावरील साई ई येथील अशा गटप्रवर्तक पदभरती चुकीच्या पद्धतीने करण्यात आली. आशी तक्रार पौर्णिमा धनस्कर यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांच्यासह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्याकडे चौकशीची मागणी केली आहे. नुकतीच काळी ( दौ.) येथे अशा पदभरतीमध्ये वार्डामधूनच अशा सेविके उमेदवारांचेअर्ज मागणी केली. व त्याच वार्डातील उमेदवारांची निवडही केली. परंतु हाच निकष साई ई येतील आशा पदभरतीला नलावला नसल्याने पूर्णिमा धनस्कर यांनी आपल्या तक्रारीतून सांगितले आहे. साई ई येथे वार्डातील अशा सेविका उमेदवारांची निवड न करता दुसऱ्या वार्डातील आशा सेविका उमेदवारांची निवड करण्यात आली. तालुकाआरोग्य अधिकारी यांनी आपल्या सेवा व कर्तव्यात कसूर करून अपात्र अर्जदारास पात्र ठरविले आहे. प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चौकशी करून कायदेशीर कारवाईची मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close