Uncategorized

धनसळ शिवारात बिबट्याने केली वासराची शिकार; वनविभागाकडे तक्रार दाखल करुनही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा पंचनामा करण्यासाठी दुर्लक्षपणा!

पुसद :तालुक्यातील धनसळ येथील शेत शिवारामध्ये लाकडाच्या मंडपात बांधून ठेवलेल्या वासराची बिबट्याने शिकार केल्याची घटना दि.१८ मार्च २०२४ रोजीच्या रात्रीला च्या दरम्यान घडली आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे वास्तव या निमित्ताने उघड झाले आहे.वन अधिकाऱ्याकडून मात्र वासरूच्या मालकाकडून दि.१९ मार्च २०२४ रोजी तोंडी तक्रार देऊनही कुठल्याही प्रकारची चौकशी केली नसल्याच्या आरोप लावल्या जात आहे.रामचंद्र नारायण राठोड रा. धनसळ यांच्या वासराची बिबट्याने शिकार केल्याचा त्यांनी दावा केला आहे.प्राप्त माहितीनुसार रामचंद्र राठोड यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतातील लाकडी मंडपात गाय व वासरू ठेवले होते. त्यानंतर रात्रीच्या वेळेला गाई ऐवजी वासराची शिकार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून पंचनामा करण्याची विनंती केली होती.परंतु ऑनलाईन तक्रार करण्याचा उरफाटी सल्ला दिल्याचा आरोप रामचंद्र राठोड यांनी लावला आहे.याप्रकरणी चौकशी करून शिकार करणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.सोबतच शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील त्यांच्याकडून होत आहे.

कर्मचारी घटनास्थळी जाऊन आले…………

वासराची शिकार केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.त्या पंचनामांमध्ये बिबट्याने शिकार केली नसून कुत्र्याने शिकार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. ऑनलाइन तक्रार अर्ज आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल. किरण राठोड,रेंजर,वनविभाग

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close