ईतर

धनसळ बिटमधिल वडसद शिवारात बिबट्याचा बकरीवर हल्ला ; वनविभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!

पुसद: तालुक्यातील वनविभागाच्या धनसळ बिट मधिल वडसद शिवारातील खंडोबाच्या टेकडी जवळ गुरांख्यानी आपले गयीढोरे व बकऱ्या चरण्यासाठी सोडले असतांना अचानक एका बकरीवर बिबट्याने हल्ला केला तेवढ्यात गुराख्यांनी आरडाओरडा केला असता त्या ठिकाणाहून बिबट्याने पलायन केले या हल्ल्यात लक्ष्मण श्रावणे रा.धनसळ यांची बकरी गंभीर जख्मी झाली आहे. हा प्रकार आज दुपारच्या सुमारास घडला आहे. या घटनेची माहिती देण्यासाठी स्थानिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यास संपर्क साधला असता वन विभागाचे कर्मचाऱ्यांने कॉल उचलला नसल्याने जाणीवपूर्वक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की. पुसद तालुक्यातील वनविभागाच्या  काही बिटमध्ये काही दिवसापूर्वी गणेशपुर भोजला या शेतशिवारात बिबट्याने पाळीव प्राण्यांच्या वासरावर हल्ला करून ठार केले आहे ह्या घटना ताजी असताना पुन्हा धनसळ बिट मधिल वडसद शिवारातील खंडोबा जवळील टेकडी जवळ पुन्हा बिबट्यानं बकरीवर हल्ला केल्यामुळे घबराट पसरली आहे. पुसद शहरालगतच्या गावातील परिसरात महिनाभरात चौथ्यांदा बिबट्याने पाळीव प्राण्यांची शिकार केली आहे. त्यामुळे या परिसरात मोठी घबराट पसरली आहे. वडसद शिवारातील खंडोबाच्या टेकडी जवळ गावातील गुराखी बकऱ्या व गुरे चारण्यासाठी गेले होते.त्यावेळी त्यांच्या डोळ्यादेखत बिबट्याने एका बकरीवर हल्ला केला आणि घेऊन जाऊ लागला. त्यावेळी गुरांख्यानी आरडाओरडा केल्यानं बिबट्या हा बकरीला तिथेच टाकून पळून गेला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाला पाचारण करण्यासाठी संपर्क साधला असता, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या स्थानिक नागरिकांचा कॉल उचलला नाही त्यामुळे वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

वनविभागाकडे पिंजरे लावण्याची मागणी
वन विभागाच्या खंडाळा येलदरी बीट मधील गणेशपुर, भोजला या परिसरात यापूर्वी सुद्धा बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या होत्या. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्ये आधीच दहशतीचं वातावरण असून त्यात आता धनसळ बीट मधील वडसद शिवारात झालेल्या घटनेमुळे भर पडली आहे. बिबट्या वारंवार हल्ले करत असल्यानं बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडे तात्काळ पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र याकडे वनविभाग गांभीर्याने लक्ष देत नसल्याची ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close